२०० हून अधिक सदस्यांचा सहभाग
पुणे :- क्रेडाई महाराष्ट्र कडून येत्या १९ आणि २० जानेवारीला हॉटेल हयात रिजन्सी येथे या राष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राच्या ५० शहरांतील २०० हून अधिक सभासद यात सहभागी होणार आहेत. शिवाय क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई – नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई – नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई-महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया,क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई नैशनलचे सचिव रोहित राज मोदी, क्रेडाई नैशनलचे उपाध्यक्ष बोमन इराणी याप्रसंगी उपस्थित असणार आहेत.
पहिल्या दिवशी ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी तसेच नगर विकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे विकसकांना मार्गदर्शन करणार आहेत. समारोपाच्या दिवशी क्रेडाईचे प्रमुख सदस्य क्रेडाईच्या शहर संघटनांनी ५० शहरात पदार्पणनिमित्त एकत्र येणार आहेत.
शहर संघटनांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेथील सदस्यांमध्ये नेतृत्वगुण निर्माण करून त्यांना प्रभारी बनविण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संवाद साधणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे.अशी माहिती शांतीलाल कटारिया यांनी दिली.