गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचे संमेलन उत्साहात संपन्न

Date:

पिंपरी -गोयल गंगा इंटरनैशनल स्कुल वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलामंथन २०१७’ उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामजिक प्रबोधन करणारी नाटके व नृत्य कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, अतुल गोयल, स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवाणी उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करण्यासाठी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे,कॉर्पोरेट सिटीझन मासिकाच्या सल्लागार संपादिका विनिता देशमुख, भरतनाट्यम करणाऱ्या श्वेता प्राचांडे, लहानापासून मोठांपर्यंत संभाषण कौशल्य शिकवणाऱ्या महरुख भरुचा या यावेळी उपस्थित होते. पूर्व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी ‘बाल्यावस्था’ तर माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी ‘कुमारवस्था’ याविषयांवर अतिशय सुंदर पद्धतीने गायन, नृत्य-नाटिका, चित्रकला यामाध्यमातून सादरीकरण केले. ज्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.मोहिनी अत्तम, कथक, लावण्या,ओडिसी आणि भरतनाट्यम या सारख्या नृत्यशैलींवर विद्यार्थिनिनी नृत्याविष्कार सादर केले.

 यावेळी  गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल म्हणाले कि, या कार्यक्रमाचा उद्देश फक्त आनंद लुटण्याचा नसून त्यातून सामाजिक मूल्ये, बौद्धिक कल्पकता, कौशल्ये,स्वत:मधील कलागुण जोपासण्याचा देखील आहे. त्यापुढच्या आयुष्यात सुद्धा  भरपूर मेहनत घेवून आपले आणि या देशाचे भविष्य उज्ज्वल करा कारण परिश्रमांना पर्याय नाही सल्ला असा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची आवड असल्यास माणूस काहीही करून दाखवू शकतो अशी भावना सिद्धार्थ शिरोळे यांनी बोलून दाखवली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

९९ रुपये लिटरचे डीझेल १५९ रुपये लिटरने का घेते महापालिका/PMPML ? फायदा कोणाला, तोटा कोणाला?

बाजारात ₹९९, महापालिकेला ₹१५९ प्रतिलिटर दराचा दावा; वर्षाला १५...

‘५०० कोटींचा आरोप १०० टक्के खोटा; भाजपचा काडीमात्र संबंध नाही!’ — आशिष शेलार

‘जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल कायदेशीर चौकशी करा’; शिंदेंवरील...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२६ - एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस...