Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शासकीय सेवा निष्ठेचा पालकमंत्र्यांकडून सन्मान

Date:

पुणे : पोलीस दलात चालक म्हणून ३८ वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मनोहर शेटे, अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत यश प्राप्त करणाऱ्या ज्ञानेश्वर धनगर या सेवकांचा त्यांच्या शासकीय सेवा निष्ठेबद्दल  पालकमंत्री गिरीश बापट  यांनी काल सन्मान केला.घोले रोडवरील महात्मा फुले वस्तुसंग्रहालयात झालेल्या या सत्कार सोहळ्याला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रदीप देशपांडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पोलीस दलात चालक म्हणून गेल्या ३८ वर्षापासून कार्यरत असणारे मोतीलाल शेटे उर्फ नाना आज सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते माझ्याकडे चालक म्हणून काम करत होते. अत्यंत मनमिळावू असलेल्या नानांनी त्यांची सेवा अत्यंत चांगल्या रितीने बजावली आहे.  माझ्यासोबत असणारे पोलीस दलातील दुसरे चालक ज्ञानेश्वर धनगर यांनीही अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या  परीक्षेत यश मिळवले. त्याचप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल अमोल मुंडे यांनीही घरच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत पोलीस दलात नोकरी मिळवून घराचा भार उचलला आहे. गेले काही दिवस माझ्यासोबत काम करत असताना या सर्वांसोबत पारिवारिक संबंध जोडले गेले आहेत.अशा कर्तव्यनिष्ठ व्यक्तींकडून तरुणांनाही आदर्श घेण्याची गरज आहे.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या, आजच्या युगात पोलिसांबद्दल विचार कोणी करत नाही. पालकमंत्र्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून आपल्यातल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. माझ्या २९ वर्षांच्या सेवेत ही माणूसकी कोणाकडे पहिली नाही. प्रत्येक नागरिकांनी पोलिसांना हा सन्मान दिल्यास आम्हाला काम करण्यास निश्चितच आणखी हुरूप येईल.

सत्काराला उत्तर देताना मनोहर शेटे म्हणाले, पालकमंत्र्यांनी आम्हाला कनिष्ट असल्याची जाणीव होऊ दिली नाही. हल्ली अनेकजण पोलिसांचा सत्कार नव्हे तर त्यांच्याशी नीट बोलतसुद्धा नाहीत त्यामुळे बापट साहेबांनी केलेल्या सत्काराने कृतकृत्य झाल्याचे मत ज्ञानेश्वर धनगर यांनी व्यक्त केले तर अमोल मुंडे यांनीही पालकमंत्र्यांचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...