Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पिंपरी चिंचवडचा नियोजन बद्ध विकास करणार : पालकमंत्री गिरीश बापट

Date:

पिंपरी:  सत्तेत राहून ही गेल्या अनेक वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडचा विकास करता आला नाही, म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. लोकांच्या विकासासाठी आम्ही वचनबद्ध असून येत्या पाच वर्षात या शहराचा नियोजनबद्ध विकास करू असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. येथील शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार  लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे,  उमा खापरे, आझम पानसरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री  म्हणाले, हा विजय आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. पिंपरी- चिंचवडचा सर्वांगीण विकास हाच आमचा जाहीरनामा आहे. या शहराचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शहराचे सर्व भाजप नेते व कार्यकर्ते एक टीम म्हणून काम करतील. या शहराची विकासाची खरी व्यवस्था आम्ही लावणार आहोत. भाजपा पिंपरी-चिंचवडच्या विकासात एक दिवसही वाया घालवणार नाही. या औद्योगिक नगरीत असलेले पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत, कचर्‍यापासून आरोग्यापर्यंतचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू . शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी  पीएमटीच्या आणखी बसेस खरेदी करू असे यावेळी त्यांनी सांगितले. पुणे मेट्रोसाठी केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पुढच्या निवडणुकीपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होईल तसेच लोणावळा ते दौंड या मार्गाला केंद्र सरकारची तत्वता मान्यता मिळाली असून, यामुळे शहरात येणारी अनावश्यक वाहतूक टाळून वाहतुकीचा ताण कमी होईल. याबरोबरच शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलांचे  तसेच रिंग रोडचे कामही लवकरच सुरू होईल. जाहीरनाम्यातील वचन पूर्ततेसाठी दर तीन महिन्यांनी त्या विषयातील  तज्ञासोबत नियोजनबद्ध  कार्यक्रमची आखणी करून विकास आराखडा तयार करण्यात येईल.  तसेच यावेळी झालेल्या कामांचा आढावा जनतेसमोर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासाच्या मुद्दा घेवून निवडणुकीला सामोरे गेल्याने पुण्यासह पिंपरी-चिंचवड मध्ये लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्याबद्दल जनतेला धन्यवाद देत यापुढेही सर्वांना सोबत घेवून शहराचा विकास करणार असल्याचे श्री बापट म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...