पुणे-
ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या दहा वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते. ही जत्रा २ ते ५ मार्च पर्यंत अॉग्रीकल्चरल ग्राऊंड, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे.
महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या दहा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.
अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शातून, मेहनतीतून ‘भीमथडी जत्रा’ हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या 11 व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास आम्हाला आहे.
मागिल वर्षी देखील भीमथडीस प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला, १ लाखांहूनही अधिक लोकांनी भीमथडीची विविधतेने नटलेली संस्कती अनुभवली. ह्या वर्षी देखील आदीवासींचे २५ स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील. या वर्षीच्या भीमथडी जत्रेचं वेगळेपण/ आकर्षण म्हणजे भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते. यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे ‘आदिवासी संस्कृती केंद्र’. यात विविध आदिवसी भागातील आदिवासींनी तयार केलेले उत्पादने, हस्तकला वस्तू , हातमाग, आदिवासी वनऔषधी , आदिवासी चित्रशैली यांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री असणार आहे.
सांगतिक कार्यक्रम / कॉन्सर्टस देखील ह्या वर्षी असतील . सर्वात तरूणांची संख्या असलेला आपला देश आहे. ग्रामीण संस्कृतीचं या तरूणांशी नात टिकवायचं असेल तर तरूणांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. संत कबीरांचे दोहे आपल्या खास ‘युथफुल’ शैलीत सादर करणारा ‘कबीर कॅफे’ हा बॅन्ड आपली संगीत कला भीमथडी जत्रेत सादर करणार आहे. आपल्या देशातील लोकसंस्कृती, लोकसंगीत आणि रॉक म्युझीक यांचा आगळ -वेगळा आणि कल्पक मिलाप करून ‘माटीबानी’ हा बॅन्ड आपली कला सादर करणार आहे. संस्कृती आणि तरूणांचा संवाद साधण्याचा हा खास उपक्रमही यंदाच्या भीमथडीचं आकर्षण असणार आहे. महाराष्ट्रातल्या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी ‘जागर लोक संस्कृतीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जागर लोकसंस्कृतीचा ह्या कॉन्सर्ट द्वारे महाराष्ट्रीय संस्कृती समझुन घेणे अानखी सोपे होईल. यंदाचा ह्या ११ व्या महोत्सवास देखील दरवर्षी प्रमाणेच पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळेत.
टेक्नोसॅव्ही भीमथडी जत्रा-
या इंटरनेटच्या युगात भीमथडी जत्राही ‘टेक्नोसॅव्ही’ झाली आहे. तुम्ही या जत्रेतील विविध उपक्रम, कॉन्सर्टस् आता इंटरनेटवरून बुक करू शकता.
www.bookmyshow.com या संकेतस्थळावरून आपले टिकीट कन्फर्म करू शकता. ऑनलाईन पे करू शकता.
रिचेबल भीमथडी जत्रा-
वाढत्या वाहतूकीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी भीमथडी जत्रेनं ‘UBER’ या वाहतूक सेवा कंपनीशी करार केला आहे. यात तुम्ही पुण्यातील कोणत्याही भागातून भीमथडी जत्रेला येण्यासाठी ‘UBER’ टॅक्सी बुक केल्यास 30 टक्के प्रवास भाड्याची सुट देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही ‘JATRA17’ हा कोड ‘UBER’ बुक करताना वापरा.