Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शांतीलाल कटारिया क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

Date:

पुणे :-  क्रेडाई – महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी शांतीलाल कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज  नाशिक येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी  एकमताने  शांतीलाल कटारिया यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.शांतीलाल कटारिया हे ‘क्रेडाई- नॅशनल’ या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे कार्यकारी समिती सदस्य असून पर्यावरण समितीचे अध्यक्ष तसेच क्रेडाई- पुणे मेट्रोचेही  अध्यक्ष आहेत.

२०१७ -१९ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  त्यात अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासमवेत राजीव पारीख (कोल्हापुर), प्रमोद खैरनार पाटील (औरंगाबाद),महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मुंबई) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक)यांची  सचिव पदी व अनुज भंडारी (पुणे) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली.

४१ शहर संघटनांच्या राज्यस्तरीय अध्यक्षपदाची जबाबदारी कार्यक्षमतेने सांभाळण्यासाठी कटारिया यांनी पुणे शहरातून राज्यस्तरीय सल्लागार समिती अध्यक्षपदी सुहास मर्चंट, आदित्य जावडेकर- (संयोजक युवा विभाग), दर्शना परमार-जैन (संयोजक महिला विभाग), आय. पी इनामदार (कायदा समिती), अश्विन त्रिमल (महसूल समिती), अखिल अगरवाल (रेरा समिती) व याव्यतिरिक्त इतर २४ सदस्यांचा महाराष्ट्रातून आपल्या कार्यकारी समितीमध्ये समावेश केला आहे. बांधकाम क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आणि त्यातून मार्ग काढण्याचे काम अनेक वर्ष ही संस्था करीत आहे. या राज्यस्तरीयसंस्थेत दर दोन वर्षानी नवीन अध्यक्षाची निवड केली जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....