पेट्रोल ४० रुपये दरानेच विकायला हवे – गुलामनबी आझाद (व्हिडीओ)

Date:

पुणे -सध्याच्या आंतरराष्ट्रीय दरानुसार जे पेट्रोल ४० रुपये लिटर दराने विकायला हवे ते पेट्रोल सरकार ८० रुपयाहून अधिक दराने विकत आहे हि लुटमार कोणाच्या खिशात घातली जाते आहे असा घणाघाती  आरोप करत काश्मीर मध्ये गेल्या 4 वर्षात सर्वाधिक नागीरीकांचे ,पोलीस आणि लष्करी जवानांचे बळी गेले ,आणि आम्ही संपुष्टात आणू पाहत असलेला आतंकवाद मोदी सरकारच्या काळात अधिक उग्र झाल्याचे येथे आज  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री  गुलामनबी आझाद यांनीसांगितले .

कोल्हापूर, सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या भागात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली.या पश्चिम महाराष्ट्रचा अखेरच्या टप्प्याची समारोपाची सभा आज पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर गुलाम नबी आजाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारीमलिकर्जुन खर्गे,काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण,विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,मोहन जोशी,अरविंद शिंदे,अविनाश बागवे,अजित दरेकर  यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी गुलामनबी आझाद म्हणाले की,स्वातंत्र्यपूर्व काळात बाहेरील व्यक्तीकडून आपल्याला धोका होता.मात्र सध्याचे देशातील वातावरण लक्षात गबेता आपल्याला आपल्या व्यक्तीकडून धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.इंग्रज बंदुकीने तर भाजप सरकार आता “सीबीआय’सारख्या यंत्रणेच्या धाकाने देशाचा कारभार करीत असून, सध्या देशात “डिक्‍टेटरशिप’ च्या माध्यमातून तीन लोक कारभार हाकत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या मूळ विचारधारेपासून देशाला खरा धोका आहे,तर काँग्रेसच्या नेत्यांनी,पदाधिकायांनी देशाच्या स्वातंत्र्यमध्ये कारवास भोगला किंवा बलिदान देखील दिले.मात्र भाजपकडून कोणत्याही नेत्यांचे स्वातंत्र्यमध्ये किंवा सध्याच्या सरकारमध्ये काही ही योगदान नाही.अशा शब्दात केंद्राच्या कारभारावर टीका केली.
ते पूढे म्हणाले की, कश्मीरमधील आमची सत्ता असताना दहशतवाद संपवला.मात्र भाजप ची त्या ठिकाणी सत्ता आल्यावर आणखी दहशतवाद वाढला असून याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खूप आश्वसने दिल्याने ते सत्तेमध्ये आले आहेत.त्यांना कोणतेही आश्वसने पूर्ण करता आली नाही.त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेऊन अर्थ व्यवस्था धोक्यात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.नोटबंदीच्या निर्णयाने अनेकांच्या हाताला रोजगार राहिला.त्यावर कोणी ही काही बोलण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की,देशात मागील महिन्यापासून संविधान बदलण्याची चर्चा सुरू आहे.संविधानामध्ये बदल केल्यास लोकशाही धोक्यात येईल.त्यामुळे या गोष्टीकडे सर्वानी लक्ष ठेवण्याची गरज असून असे प्रकार हानून पाडण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पुण्यात आम आदमी पार्टीचा बैलगाडी मोर्चा

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आम आदमी पार्टीचे...

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम...