2 माजी मंत्र्यांचा भन्नाट डान्स (व्हिडीओ)

Date:

पुणे– गोविंदा आला रे आला … च्या बँडबाजाच्या धून वर पुण्यातील कॉंग्रेस भवनात 2 माजी मंत्र्यांनी भन्नाट नृत्य करीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरील निवडीने आनंद व्यक्त करीत जल्लोष केला . माजी अध्यक्ष ,आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनींच कॉंग्रेस भवनातील या आनंद व्यक्त करणाऱ्या नृत्य सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत जल्लोष केला .
आज राहुल गांधी यांनी अखिल भारतीय कोंग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली, त्या निमित्ताने येथे आज फटके फोडण्यात आले , पेढे ,जिलेबी , मिठाई वाटण्यात आली . पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी शहर कॉंग्रेसच्या बैठकीत अभिनंदनचा ठराव मांडला व  कमल व्यवहारे यांनी अनुमोदन दिले, यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर , माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड ,खडकी कँटोमेंट बोर्डाचे सदस्य मनीष आनंद,शहर महिला अध्यक्ष सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे, सुरेश बोराटे ,संगीता तिवारी,रमेश अय्यर  व सर्व जेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, महिला फ्रंट, सेवादल, सर्व सेल, चे अध्यक्ष व कार्यकर्ते  उपस्थित होते.
नांदेड महापालिकेच्या विजयानंतर शहर कॉंग्रेस मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते . आता राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवद्मुळे पक्षात आणखी चैतन्य निर्माण झाले आहे. कॉंग्रेस भवन मध्ये होणाऱ्या गर्दीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंगालमध्ये परिवर्तन नव्हे तर महापरिवर्तन- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-आज पश्चिमन बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामच्या निवडणुकांची मतमोजणी...

रविवार ठरला पुस्तक खरेदी अन् खेळांचा वार

पुणे बाल पुस्तक जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : उन्हाळी सुटीचा...

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. ६ ते ८ मे पर्यंत पुण्यात आयोजन

कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या स्पर्धेसाठी ४१ संघ सहभागी...