Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कलर्स मराठीवरील 2 मॅड च्या टीम ने जिंकले पुणेकरांचे मन

Date:

पुणे: कलर्स मराठीवर एक नवीन धमाकेदार डान्स रिअॅलिटी कार्यक्रम सुरु आहे 2 मॅड (MAD)- महाराष्ट्राचा अस्सल डान्सर! या निमित्ताने  2 मॅडचे परीक्षक महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना अमृता खानविलकर, सुप्रसिद्ध निर्मातेदिग्दर्शक संजय जाधव तसेच सगळ्यांचे लाडके आणि नृत्याबद्दल खास प्रेम असलेले नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव पुणेकरांच्या भेटीला आले होतेकावेरी इन्स्टिट्युट मध्ये 2मॅडच्या परीक्षकांकडून तरुणाईला नृत्याबद्दलचे अलौकिक ज्ञान लाभले, तसेच 2 मॅड च्या टायटल गीतावर परीक्षकांनी ठेका धरला तोच ठेका पकडत तरुणाई सुद्धा त्यांच्याबरोबर सहभागी झालीपुणेकरांच्या या प्रचंड उत्साहाने 2मॅडचे परीक्षक अतिशय प्रभावित झाले

 या कार्यक्रमावेळी कॉलेज मधील विद्यार्थ्यांची डान्स प्रतियोगिता घेण्यात आली. उत्कृष्ट स्टेप्स चे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले त्याने परीक्षक सुद्धा अचंबित झाले. या प्रतियोगितेमधील  विजेत्यांना कलर्स मराठी तर्फे विशेष बक्षिसे देण्यात आली. या प्रतियोगीतेमध्ये श्रेया इंगळहळीकर विजेती ठरली तर उपविजेता पिंटू यादव हा ठरला तर ऐश्वर्या माळी आणि अक्षया पाटील या स्पर्धकांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले

 या कार्यक्रमावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर म्हणाली कि, कोणत्याही कलेची आस आयुष्यात असणे  खूप आवश्यक आहे. मला नृत्याबद्दल प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे, आज माझी ओळख हि नृत्यामुळेच प्रभावी ठरली आहेमॅड या शो मध्ये असेच काही भन्नाट डान्सर आपल्या सर्वांना पाहायला मिळतील कि जे डान्स बाबतीत प्रचंड मॅड आहेत

 या प्रसंगी सुप्रसिद्ध निर्मातेदिग्दर्शक संजय जाधव म्हणाले कि, 2 मॅड या रिअॅलिटी शो मध्ये  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या तुफान डान्सरचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. मी खूपच उत्सुक आहे

 या रिअॅलिटी शो चे तिसरे परीक्षक सगळ्यांचे लाडके आणि नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव म्हणाले कि, मॅड या शो मध्ये असे काही डान्सर पाहायला मिळत आहेत कि ज्यांची आपण कोणी कधी कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रात एवढे मोठे टॅलेंट आहे कि चाळीसगाव सारख्या शहरामधील एक डान्सर कि ज्याने झिरो ग्रॅव्हिटी स्टेप्स केल्या कि ज्या पाहून मी अचंबितच झालो आणि  खरंच हि खूप अभिमानाची गोष्ट आहे कि आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक गोष्टींचं टॅलेंट भरभरून आहे, एखाद्या कलेवर किती प्रेम असावं हे मी या मॅड च्या शो मधून जाणलं

 मॅड च्या पहिल्या पर्वाच्या यशानंतर याच कार्यक्रमाचे धमाकेदार दुसरे पर्व 2 मॅड(MAD) – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर कलर्स मराठीवर पहायला मिळत आहेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ करत आहे. 2 मॅड –महाराष्ट्राचा अस्सल डान्सर हा मंच सज्ज आहे एक असा रंगमंच घेऊन ज्याने महाराष्ट्रातील प्रत्येक डान्सरला त्यांच्यातील अद्भुत नृत्यकला जगासमोर दाखविण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे

2 मॅड – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर सोममंगळ रात्री :३० वा. फक्त कलर्स मराठीवर पहाता येणार आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...