कोवीनचा गोंधळच फार-आमचा अॅॅप आम्हाला करू द्यात

Date:

राज्यासाठी वेगळे लसीकरण अॅप सुरू करण्यास सीएम ने मागितली पीएम कडे परवानगी ..

मुंबई- कोविन अॅॅप मध्ये अनेक त्रुटी असून त्यामुळे युवा लसीकरणास बाधा येत असून आमच्या राज्यापुरते राज्यासाठी नवीन अॅप तयार करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्याकडे मागितली आहे.

राज्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाचआता कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. दरम्यान 1 मेपासून 18 वर्षांच्या वरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी अॅपवर नोंदणी करावी लागत आहे.याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे महत्त्वाची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.

लसीकरण अॅपवर नोंदणीपासून लसीचा पहिला डोस घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. तसेच नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात अॅपमुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून राज्यासाठी नवीन अॅप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी या पत्रामध्ये लिहिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...

आ.संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची प्रकाशक संघाची मागणी

पुणे - 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे प्रकाशक ...

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...