दिल्ली- महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौरपदाच्या निवडणुकीनंतर बुधवारी सायंकाळी स्थायी समितीच्या निवडणुकीला सुरुवात झाली. यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. आप आणि भाजप सदस्यांमध्ये मध्यरात्री १२ :५५ ला हाणामारी सुरू झाली. त्यामध्ये पुरुष नगरसेवकांसह महिला नगरसेवकांचाही समावेश होता
दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. सभागृहात एकमेकांवर बॉटल फेकल्या. मतपेट्या देखील फेकल्या गेल्या. नवनिर्वाचित महापौर शेली ओबेरॉय म्हणाल्या की, भाजपच्या नगरसेवकांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या गुंडगिरीचा हा अंत आहे, महिला महापौरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
बुधवारी रात्री उशिरापर्यंत सभागृहात गोंधळ सुरू होता..त्यानंतर दीड वाजता सत्यनारायण बन्सल सभागृहात आप चे काही सदस्य स्थायी समिती निवडणूक घेणारच म्हणून इन्कलाब ची गाणी गात होती .
दोन्ही पक्षांचे नगरसेवक सभागृहातच झोपी गेले. त्याचे फोटोही समोर आली आहेत. गुरुवारी सकाळी न्याहारी झाल्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र, गदारोळामुळे कामकाज पुन्हा तासभर तहकूब करण्यात आले. बुधवारी दुपारी ते गुरुवारी सकाळपर्यंत सभागृहाचे कामकाज 6 वेळा तहकूब करण्यात आले.