शैली ओबेरॉय यांनी BJPच्या रेखा गुप्तांचा केला पराभव; 241 नगरसेवक, 10 MP, 14 MLAनीं केले मतदान
नवी दिल्ली-दिल्लीत पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने महापौरपद मिळवले आहे. बुधवारी झालेल्या मतदानात ‘आप’च्या शैली ओबेरॉय यांनी भाजपच्या रेखा गुप्ता यांचा पराभव केला. या निवडणुकीत एकूण 241 नगरसेवकांनी मतदान केले. त्याचवेळी काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. MCD निवडणुकीसाठी आज सकाळी 11.20 वाजता सिव्हील सेंटरमध्ये मतदान सुरू झाले. दोन तास मतदान प्रक्रिया पार पडली.
महापौरपदासाठी ‘आप’च्या शैली ओबेरॉय आणि भाजपच्या रेखा गुप्ता यांच्यात लढत झाली. तिसऱ्या उमेदवार म्हणून ‘आप’च्या आशु ठाकूरही रिंगणात होत्या. दिल्लीत एमसीडीच्या निवडणूका 4 डिसेंबरला पार पडल्या, तर त्यांचे निकाल 8 डिसेंबरला लागले होते. 15 वर्षांनंतर MCD मधील भाजपची सत्ता गेली आहे.