लॉकडाउनच्या विरोधात शहर भाजपचा ‘सविनय कायदेभंग’

Date:

पुणे, ता. ७ : लॉकडाउनच्या विरोधात पुणे शहर भाजप आक‘मक झाली असून, आज भाजपच्या व्यापारी आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली बिबवेवाडी परिसरातील हार्डवेअरचे दुकान उघडून ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन सुरू केले. आमदार माधुरी मिसाळ, शहर सरचिटणीस गणेश घोष, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास यावेळी उपस्थित होते.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘राज्याच्या आदेशापेक्षा पुणे शहरात वेगळा लॉकडाउन लावण्यात आला आहे. हा लॉकडाउन व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि हातावर पोट असणार्‍या श्रमिकांवर अन्याय करणारा आहे. या लॉकडाउनमुळे पुणे शहराची अर्थव्यवस्था बिकट होणार आहे. तसेच सर्वसामान्यांना रोजची भाकरी मिळणे ही अवघड होणार आहे. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाला आम्ही दुकाने उघडून सविनय कायदेभंगाने विरोध करीत आहोत.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘सरकार पुण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेत आहे. त्यात एकवाक्यता नाही. पुण्यातील सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहराची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. नागरिकांची गैरसोय होणार आहे. यातून हप्ते वसुली सुरू होण्याची भीती आहे. ज्याप्रमाणे राज्यात लॉकडाउन आहे, त्याच नियमांवर आधारित शहरात लॉकडाउन सुरू करावे. सर्वप्रकारच्या दुकानांना परवानगी द्यावी, संचारबंदी रात्री ८ नंतर लागू करावी आणि पीएमपीची बससेवा पूर्ववत सुरू करावी या आमच्या मागण्या आहेत. त्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात. राज्य सरकारच्या अन्याय मागण्यांच्या विरोधात भाजप व्यापार्‍यांच्या बरोबर आहे.’

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘राज्य शासनाने ब्रेक द चेनचा आदेश काढला. परंतु त्यातून पुण्याला वगळले आणि अधिक कठोर निर्बंध लावले. एकप्रकारे हा संपूर्ण लॉकडाउनच आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे ते या परिस्थितीतून बाहेर येत होते. तर नवीन नियमांमुळे त्यांच्यावर आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे हाल होणार आहेत. शहरात राज्याप्रमाणे नियमावली जाहीर करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...