अनिरबन लाहिरीचा ड्रायव्हर व डेव्हिड फेरर्स याचे शूजचा देखील लिलावात
जवळपास ७ लाख रूपयांची चॅरिटी मिळाली
पुणे- निर्मयान चॅरीटी प्रो-अॅम ही भारतातील एकमेव चॅरीटी प्रो-अॅम टुर्नामेंट पुण्यात पार पडली. याचा पारितोषिक समारंभ नुकताच (७ जानेवारी) रोजी जे. डब्ल्यू. मॅरियट येथे झाला. पुण्यातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक गोल्फपटू राजीव दातार यांनी टुर्नामेंटचे आयोजन केले असून प्रथम एज्यूकेशन फाऊंडेशनचे सहकार्य लाभले. यावेळी नेहा सरीन आणि गोल्फपटू कुणाल भसीन उपस्थित होते. सरीन यांनी स्वरोस्कीच्या विजेत्यांना पारितोषिक देऊन अभिनंदन केले. मुकेश कुमार याने चषक जिंकले. त्याचा सामना गतविजेता शिव कुमार याच्याबरोबर होता. प्रथमचे संस्थापक माधव चव्हाण यांच्या टीमने काॅलअवे गोल्फ ड्रायव्हर्स जिंकली.
हा लिलाव खूप रोमांचक होता. पुण्यातील मनिषा जेठा यांनी हा लिलाव जिंकला. आयपीएल २०१६ मधील मास्टर ब्लास्टर सिचन तेंडूलकर याच्या स्वाक्षरीची बॅट जिंकली. त्यांनी यासाठी २ लाख ५० हजार रूपयांची बोली लावली होती. डेव्हिड फेरर्स यांच्या स्वाक्षरीचे शूजसाठी शिव कपूर यांनी ५० हजार रूपयांची बोली लावली. तसेच रिओ आॅलिंपिक २०१६ मधील अनिरबन लाहिरी यांचे शूजसाठी उज्जवल सिंग आणि कनवालीजीत सिंग यांनी ४२ हजार रूपयांचा लिलाव लावला. यातून सुमारे ७ लाख रूपयांची रक्कम चॅरिटीला मिळाली.
सचिनच्या बॅटसाठी लावण्यात आलेला लिलाव फार रोमांचक होता. क्रिकेटला देवता मानणार्या सर्वांना ही बॅट आपल्याकडेच असवी असे वाटत होते. याबद्दल मनिषा म्हणाल्या, हा लिलाव जिंकताना खूप आनंद होत आहे. हा क्षण माझ्या ह्रदयाच्या खूप जवळाचा आणि अविस्णरणीय आहे.
वसीम खान आणि निकुंज धनुका यांच्यामध्ये गोल्फपटू लाहिरीच्या ड्रायव्हरसाठी तीव्र बोली झाली. लाहिरीने ३२७ यार्ड पीजीसीए चॅम्पियनशिप जिंकली होती. हा लिलाव १ लाख २० हजारांपर्यंत गेला.
दातार म्हणाले, या सर्व गोल्फपटूंमुळे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. यांच्यामुळेच सामना खूप चांगला रंगला