ठाणे-”भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. पण मी पंधरा वर्षे भाजपच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक झालो मग मी भाजपमध्ये कसा जाईल अशी स्पष्टोक्ती मनसेचे पुण्यातील माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.
राज ठाकरेंच्या भोंग्याच्या विधानाला प्रत्युत्तर त्यांच्याच पक्षाचे पुणे येथील तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिले होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या रोषालाही मोरे यांना जावे लागले. पण त्यानंतरही आपण पक्षाचे अविभाज्य भाग आहोत असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज ठाण्यातील राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहत वसंत मोरे यांनी सभेला संबोधन केले.
वसंत मोरे म्हणाले की, ”भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. पण मी पंधरा वर्षे भाजपच्याच नगरसेवकांना हरवून नगरसेवक झालो, त्यामुळे मी भाजपमध्ये कसा जाईल असे म्हणत मी चंद्रकांत पाटील यांची ऑफर नाकारली. असा महाराष्ट्रातील एकही पक्ष नाही ज्यांनी मला ऑफर दिली नाही असे सांगत मला मनसेने मोठे केले असे विधान वसंत मोरे यांनी केले.
कोविड काळात मनसेचे काम अत्यंत महत्वाचे होते. राज ठाकरे या सामाजिक कामांचे नैतृत्व केले, राज ठाकरेंचे काम महत्वाचे असून त्यांची ब्लु प्रिंट वाखण्याजोगी आहे असेही मोरे् म्हणाले.