पुणे- महर्षी कर्वे यांच्यापेक्षा मोठे नाहीतच आपण ,पण कर्वे पुतळ्यानजीकच भला मोठ्ठा चंद्रकांत दादा पाटलांचा फोटो लावायचा अति उत्साह दाखविणाऱ्या कार्यकर्त्याला फैलावर घेत हा फ्लेक्स तातडीने काढून घ्यायचे आदेश मंत्री पाटलांनी संबधित कार्यकर्त्याला दिले आहेत . त्यामुळे हा फ्लेक्स आता तातडीने उतविण्याची कार्यवाही होत आहे. आप चे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी कर्वे यांच्यापेक्षा पाटील मोठे झालेत काय ? असा सवाल करत या फ्लेक्स वरून भाजपा आणि मंत्री पाटलांवर टीका केली होती ,याबाबतचे वृत्त माय मराठी ने प्रसिद्ध करताच याची दखल घेत हि कार्यवाही झाल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांच्या अति उत्साहामुळे असे कधी कधी मंत्र्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागते हे यावरून स्पष्ट झाले आहे.