Industrialist

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्समध्ये फक्त एका मिनिटात मिळेल पॉलिसीवर इन्स्टंट लोन

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सच्या MyDigiAccount पोर्टलवर पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमार्फत मिळेल १ लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोनकमीत कमी कागदपत्रे आणि स्पर्धात्मक व्याजदर मुंबई, २७ मे २०२४:  भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने (टाटा एआयए) आपल्या ग्राहकांसाठी एक क्रांतिकारी सेवा सुरु केली आहे. टाटा एआयएच्या पॉलिसीधारकांना अचानक पैशांची गरज भासल्यास, आपले विमा संरक्षण गमवावे न लागता, विमा पॉलिसीवर १ लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन मिळवता येईल. टाटा एआयएच्या अत्याधुनिक MyDigiAccount पोर्टलमार्फत लोनची रक्कम फक्त १ मिनिटाच्या आत ग्राहकांच्या खात्यावर जमा केली जाते. सेवा सुरु करण्यात आल्यापासून, या डिजिटल-फर्स्ट उपक्रमामध्ये ५०० पेक्षा जास्त विनंत्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे आणि जवळपास ५.५ कोटी रुपयांची कर्जं दिली गेली आहेत. अशाप्रकारे टाटा एआयएने आपल्या पॉलिसीधारकांसाठी अतिशय सुविधाजनक लिक्विडीटी उपाय प्रस्तुत केले आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन टाटा एआयएचे ग्राहक निवडक जीवन विमा पॉलिसींच्या सरंडर व्हॅल्यूवर लोन घेऊ शकतात. खूपच कमी कागदपत्रे आणि स्पर्धात्मक व्याज दर यांचा लाभ घेत तातडीने रक्कम मिळवू शकतात. पॉलिसीधारक काहीही उधार न ठेवता, तसेच क्रेडिट तपासणी केली न जाता, दर साल ८.८० % व्याज दराने लोन घेऊ शकतील. पर्सनल लोनच्या सध्याच्या व्याज दरांच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे. ही संपूर्ण प्रक्रिया खूपच सुव्यवस्थित आहे, त्यामुळे लोन अप्रूव्हलला होणारा उशीर यामध्ये होत नाही आणि अर्ज सादर केल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पॉलिसीधारकाला आपली रक्कम मिळते. टाटा एआयएचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि संचालन प्रमुख श्री संजय अरोरा यांनी सांगितले, "अचानक पैशांची गरज कोणालाही, कधीही भासू शकते, अशावेळी आपल्या प्रियजनांच्या आर्थिक सुरक्षेशी तडजोड करण्याची कोणाचीच इच्छा नसते. इन्स्टंट लोन सुविधा आमच्या ग्राहकांप्रती आमची बांधिलकी अधोरेखित करते, कोणत्याही परिस्थितीत आणि आपल्या पॉलिसीबाबत त्यांना चिंतामुक्त राहता यावे असा आमचा प्रयत्न असतो. आम्हाला गर्व आहे की, या उद्योगक्षेत्रामध्ये लोन पेआऊटसाठी डिजिटल एन्ड-टू-एन्ड सुविधा प्रदान करणारी आमची पहिली कंपनी आहे. ग्राहकांना असामान्य अनुभव प्रदान करण्याची आणि विमा उद्योगक्षेत्रात नवे मापदंड निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आमची वचनबद्धता यातून दिसून येते." उद्योगक्षेत्राकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार समजते की, दरवर्षी अनेक जीवन विमा पॉलिसी लॅप्स होतात. आयआरडीएआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सरंडर/विथड्रॉवलसाठी दिल्या जाणाऱ्या लाभांमध्ये २६.५२% ची वाढ होऊन ते १.९८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ही आकडेवारी मॅच्युरिटीच्या खूप आधी सरंडर केल्या जाणाऱ्या जीवन विमा पॉलिसींची संख्या दर्शवते. अचानक रकमेची आवश्यकता भासणे किंवा आर्थिक संसाधनांची कमतरता अशी अनेक कारणे यामागे असू शकतात. अशावेळी टाटा एआयएचे पॉलिसीधारक आपल्या टाटा एआयए विमा पॉलिसीवर लोन घेऊ शकतात. पारंपरिक पॉलिसीच्या सरंडर व्हॅल्यूवर लोन दिले जाते; सरंडर व्हॅल्यू म्हणजे अशी रक्कम जी पॉलिसीधारकांना पॉलिसी मॅच्युरिटीच्या आधी समाप्त केल्यावर मिळते. पॉलिसीवर लोन सुविधेमध्ये पॉलिसीधारक वेळखाऊ लोन प्रोक्युअरमेंट प्रक्रियेपासून वाचू शकतात आणि यामध्ये व्याज दर पर्सनल लोनच्या तुलनेत कमी असतो. ग्राहक कर्जाची परतफेड आपल्या सोयीनुसार करू शकतात, शिल्लक रक्कम विमा दावा रक्कम देताना ऍडजस्ट केली जाते. रोख रक्कम प्रवाहामध्ये अडचणींमुळे लोन मिळवण्यात अडचणी येणाऱ्या व्यक्तींना ही सेवा खूप उपयोगी पडू शकते. बँका आणि एनबीएफसी लोन देताना क्रेडिट स्कोर पाहतात पण टाटा एआयए आपल्या पॉलिसीधारकांचा क्रेडिट स्कोर तपासत नाही आणि काही गहाण देखील ठेवावे लागत नाही. टाटा एआयए लाईफ आणि इन्स्टंट लोन सुविधेबद्दल अधिक माहितीसाठी कृपया https://www.tataaia.com/ जा.

टीव्हीएस यंग मीडिया रेसर्स प्रोग्रॅम ८.० सह टीव्हीएस रेसिंगचे पुनरागमन, एमआयसी, चेन्नई येथे निवड फेरी

चेन्नई, – १९८२ पासून रेसिंग क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्यात आघाडीवर असलेले टीव्हीएस रेसिंग मद्रास इंटरनॅशनल सर्किट (एमआयसी) येथे टीव्हीएस यंग मीडिया रेसर प्रोग्रॅमची (वायएमआरपी) आठवी आवृत्ती...

गोदरेज कॅपिटलचा महाराष्ट्रातील डेअरी फार्म कर्जामध्ये प्रवेश

क्रीमलाइन डेअरी प्रोडक्ट्स लिमिटेड आणि द्वारा ई-डेअरी सह भागीदारी §  या भागीदारीद्वारे, डेअरी फार्मिंग समाजाला सक्षम करणे हे गोदरेज कॅपिटलचे उद्दिष्ट आहे. तसेच संपूर्ण इकोसिस्टीममध्ये आर्थिक समावेशकता आणि आर्थिक समृद्धी आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. §  आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू शेतकऱ्यांना मदत देण्याची योजना मुंबई, २१ मे, २०२४: गोदरेज उद्योग समूहाची वित्तीय सेवा शाखा, गोदरेज कॅपिटलने डेअरी फार्म लोन लाँच करून कृषी क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली. क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि द्वारा ई-डेअरी यांच्यासोबत धोरणात्मक भागीदारी करत गोदरेज कॅपिटल महाराष्ट्र आणि इतर भागातील  लहान डेअरी फार्म मालकांना आर्थिक सहकार्य करेल. क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड ही गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची उपकंपनी आहे. गोदरेज उद्योग समुहाअंतर्गत ही कंपनी वैविध्यपूर्ण खाद्य आणि कृषी-व्यवसाय पाहते. गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने ही उत्पादनांची विक्री करते. भारतातील दुग्धजन्य पदार्थांचा वापर सातत्याने वाढत असल्याने, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही उत्तम संधी तर आहेच पण आव्हाने देखील निर्माण करते. उत्पादकता सुधारणे तसेच देशात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी वेळेवर आणि योग्य वित्तपुरवठा करून या शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे महत्त्व गोदरेज कॅपिटलने ओळखले आहे. म्हणूनच या उपक्रमांतर्गत, गोदरेज कॅपिटलने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भागीदार म्हणून Dvara E-Dairy ला सोबत घेतले आहे. दुग्धव्यवसायासाठी कर्ज देण्यासोबतच गोदरेज कॅपिटल GAVL च्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना गुराढोरांची खरेदी तसेच त्यांच्या देखभालीसाठी तारण-मुक्त कर्ज उपलब्ध करून देईल. या ऑफरमुळे डेअरी फार्म मालकांना आर्थिक सहकार्य तर मिळेलच पण यासह इतर फायदे देखील मिळतील. यात पूर्ण डिजीटल प्रक्रिया, कर्ज किंवा अन्य अर्जाची जलद मंजुरी आणि वितरण आणि दोन वर्षांपर्यंतचे कर्जफेडीचा पर्याय यांचा समावेश आहे. गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले, "आमच्या देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. दुग्धव्यवसाय समाजाला आर्थिक सहाय्य, प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच याद्वारे एक सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णागिरी जिल्ह्यात पहिल्या कर्जाचे वितरण ही केवळ एक सुरुवात आहे. वास्तविक आम्ही तामिळनाडूच्या इतर प्रदेशांमध्ये डेअरी उद्योग सक्रिय करण्यात आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासह डेअरी फार्मिंग क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे.” अनेक मर्यादा असूनही आजही डेअरी उद्योगाचे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. यावर जवळपास 80 दशलक्ष शेतकऱ्यांची उपजीविका चालते. दुधाच्या एकूण खर्चाच्या 70% मध्ये आहार हा सर्वात मोठा घटक आहे. उत्तम आणि पोषक आहार हा निरोगी दुग्धव्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. याचा गुरांच्या दुग्धउत्पादकतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होते. उत्तम आणि भरपूर दूध उत्पादनासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भूपेंद्र सुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गोदरेज जर्सी, म्हणाले, “गुरांचे चांगले आरोग्य म्हणजे उत्तम दुग्धउत्पादन. यामुळे शेतकरी देखील सक्षम होतात. आणि त्यांचा नफा वाढतो. त्यामुळे, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर्जेदार खाद्य उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. गोदरेज कॅपिटल आणि द्वारा ई-डेअरी यांच्यातील ही भागीदारी शेतकऱ्यांना गुरांचे दर्जेदार खाद्य मिळवून देईलच पण शेतीविषयक इतर गरजांसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्यास सक्षम करेल. या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन आमचे शेतकरी गुरांची संख्या वाढवू शकतात तसेच उच्च उत्पादकता आणि चांगल्या समृद्धीसाठी प्रयत्न करू शकतात.” Dvara E-Dairy चे संस्थापक, MD आणि CEO रवी के.ए. म्हणाले, "गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या कंपन्यांसोबत भागीदारी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या भागीदारीमुळे भागधारकांचे मूल्य वाढले आहे. तसेच यामुळे हजारो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गोदरेजकडून परवडणाऱ्या दरात वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे. याशिवाय भांडवल तसेच कॅटल लोनसाठी हा एक नावीन्यपूर्ण प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. या सगळ्या व्यवस्थेमुळे आर्थिक सेवा या अगदी घरात उपलब्ध होणार आहेत. यासोबतच दुग्ध उत्पादकांना दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी, त्यांच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल." गोदरेज कॅपिटल सर्वसमावेशक वातावरण निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे, तसेच जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना आर्थिक पाठबळही देत आहे. यासोबतच, गोदरेज कॅपिटल एमएसएमई कर्जासाठी महाराष्ट्राच्या बाजारपेठेतील 10% हिस्सा मिळवण्याचा विचार करत आहे. मागील वर्षापासून ही कंपनी पाय भक्कमपणे रोवून उभी असून त्याच आधारे कंपनीने कोल्हापूर आणि ठाणे उघडत राज्यात आपला ठसा उमटवला आहे. स्थानिकांच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच त्या - त्या भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गोदरेज कॅपिटल काय काय करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा विस्तार. 

 टीवीएस नेअपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन ब्लॅक एडिशन केली पुण्यात लाँच

पुणे, 21 मे, 2024: दुचाकी आणि तीनचाकी विभागात कार्यरत वाहन निर्माता कंपनी टीवीएस मोटर कंपनी (टीवीएसएम) - आज टीवीएस अपाचे 160 सिरीज मोटारसायकलचे 'ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात लॉन्च केले आहे. टीवीएस अपाचे आरटीआर 160 आणि आरटीआर 160 4वी...

राजस्थानमध्ये सिमेंट केंद्र सुरू करण्यासाठी करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक 

उत्तर भारतातील बाजारपेठेत JSW सिमेंटचा प्रवेश झाला आहे इक्विटी आणि दीर्घकालीन कर्ज याचे नियोजन करत गुंतवणूक करायची आहे मुंबई - 21 मे 2024: 24.25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या JSW समूहाचा भाग असलेल्या JSW सिमेंटने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड, एकात्मिक सिमेंट उत्पादन सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 3,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सिमेंट कारखान्याचे  भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. JSW सिमेंटच्या या नवीन सिमेंट सुविधा केंद्रात 3.30 MTPA पर्यंतचे क्लिंकरायझेशन युनिट, 2.50 MTPA पर्यंतचे ग्राइंडिंग युनिट, तसेच 18 मेगावॅटच्या वेस्ट हीट रिकव्हरी बेस्ड पॉवर प्लांटचा समावेश आहे. तसेच खाणीतून चुनखडी प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आणि भट्टीत पर्यायी इंधन वापरण्याची व्यवस्था याची देखील व्यवस्था करून त्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रस्तावित गुंतवणुकीला इक्विटी तसेच दीर्घकालीन कर्जाच्या समन्वयातून निधी दिला जाईल. JSW सिमेंटने यासंदर्भातील काही नियामक आणि वैधानिक मंजुरी आधीच मिळवल्या आहेत. तसेच इतर आवश्यक मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे युनिट एकदा कार्यान्वित झाल्यानंतर JSW सिमेंट उत्तर भारतातील आकर्षक सिमेंट बाजारपेठेत प्रवेश करेल. सध्याच्या गुंतवणुकीमुळे 1 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पार्थ जिंदाल म्हणाले की, “आमच्या सिमेंट व्यवसायाद्वारे राजस्थानमध्ये करत असलेली ही आमची सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. या भागात रोजगाराच्या भरीव संधी निर्माण करून राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी मी राजस्थान राज्य सरकारसोबत सहयोग  करण्यास उत्सुक आहे. नागौरमध्ये एकात्मिक सिमेंट सुविधा निर्माण करण्यासाठीच्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे JSW सिमेंट पुढील काही वर्षांत संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवेल. या प्रदेशातील हे नवीन केंद्र आम्हाला उत्तरेकडील राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि NCR प्रदेशातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करेल. JSW सिमेंटचे CEO श्री. नीलेश नार्वेकर म्हणाले, “या गुंतवणुकीमुळे आम्ही उत्तर भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या आणि आकर्षक सिमेंट मार्केटमध्ये प्रवेश करणार आहोत. या राज्यातील जीडीपी वाढीचा दर सर्वाधिक आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण विकासही झालेला दिसतो. या तेजीत असलेल्या बांधकामासाठी पोषक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत तसेच आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे सिमेंट आणि जागतिक दर्जाची ग्राहक सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे.”

Popular