● नुकत्याच झालेल्या फंडिंग राउंडमुळे रॅपिडोचे मूल्यांकन वाढून १.१ अब्ज डॉलर्सवर
● या गुंतवणुकीमुळे शहरी वाहतूक क्षेत्रात रॅपिडोचा विस्तार आणि नेतृत्वाला बळकटी मिळणार
● युजर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूक, जीएमव्हीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत २.५ पटींची वाढ, २.५ दशलक्ष दैनंदिन राइड्स पूर्ण
बेंगळुरू, – रॅपिडो या भारतातील आघाडीच्या राइड शेयरिंग प्लॅटफॉर्मने सीरीज ई फंडिंगमध्ये २०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळवत भारतात शेयर्ड मोबिलिटी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या आपल्या प्रवासात ऐतिहासिक टप्पा रचला.
सीरीज ई फंडिंग राउंडमध्ये आघाडीवर असलेली वेस्टब्रिज कॅपिटल ही गुंतवणूक क्षेत्रातील प्रमुख कंपनी असून भारतात गुंतवणूक करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. या राउंडमध्ये सध्याचे गुंतवणूकदार नेक्सस आणि नवे गुंतवणूकदार थिंक इन्व्हेस्टमेंट्स आणि इनव्हस अपॉर्च्युनिटीजही सहभागी झाले होते. या गुंतवणुकीमुळे रॅपिडोचे मूल्यांकन १.१ अब्ज डॉलर्सवर गेले असून शहरी वाहतूक क्षेत्रातील कंपनीचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
रॅपिडोचे सह- संस्थापक अरविंद सांका या फंडिंगविषयी म्हणाले, ‘या नव्या भांडवलासह आम्ही सुविधांचा विस्तार करत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर भर देणार आहोत. गेल्या वर्षभरात आम्ही लक्षणीय विकास साधला असून दैनंदिन राइड्सची संख्या २.५ दशलक्षांवर गेली आहे. या गुंतवणुकीमुळे आमच्या सेवांमध्ये नाविन्य आणत त्या उंचावण्याची क्षमता कंपनीला मिळणार आहे. पर्यायाने ग्राहकांना आणखी चांगली सेवा देणे आणि प्रत्येकासाठी शहरी वाहतुकीचा लक्षणीय विकास करणे आम्हाला शक्य होणार आहे.’
वेस्टब्रिज कॅपिटलचे सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीर चढ्ढा म्हणाले, ‘आम्ही केलेल्या प्राथमिक गुंतवणुकीनंतर गेल्या पाच वर्षांत अरविंद, पवन, ऋषीकेश आणि टीमने या संकल्पनेचे भारतातील कमी खर्चातील वाहतूक सेवा प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर करताना आम्ही पाहिले आहे. बाइक टॅक्सीचे वर्चस्व तयार करण्यापासून ३डब्ल्यू ऑटो व कॅब क्षेत्रात प्रगती करण्यापर्यंत त्यांनी केलेला विकास, कामकाजातील त्यांचा उत्साह आणि ग्राहक व कॅप्टन समाधानावर असलेला सातत्यपूर्ण भर दिसून आला आहे. भांडवल प्रभावीपणे वापरून रॅपिडोला भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कन्झ्युमर इंटरनेट अपचे स्थान मिळवून दिल्याबद्दल आम्ही टीमचे अभिनंदन करतो. या नव्या फंडिंग राउंडमुळे त्यांच्या प्रवासाप्रती आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.’
नव्याने उभारण्यात आलेला निधी भारतात रॅपिडोचा धोरणात्मक विस्तार करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवत सेवा उंचावण्यासाठी वापरला जाईल. रॅपिडोने सर्व विभागांत आपले कामकाज विस्तारण्याचे ध्येय ठेवले असून त्यात बाइक टॅक्सीज, तीन चाकी आणि टॅक्सी कॅब यांचा समावेश असेल.
नऊ वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासून १५० टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक विकास साधत भारतातील कन्झ्युमर इंटरनेट क्षेत्राचे पुनरूज्जीवन करत शेयर्ड मोबिलिटी क्षेत्रात अग्रेसर स्थान मिळवले आहे. सुरुवातीला बाइक- टॅक्सीजवर भर देत कंपनीने नंतर ऑटो व कॅब सेवा क्षेत्रात विस्तार केला आणि आपले मूल्य तसेच कामकाज बळकट केले. रॅपिडोने प्रमुख शहरांपलीकडे आपली सेवा विस्तारत १०० पेक्षा जास्त शहरांत अस्तित्व निर्माण केले आहे. त्यात देशभरातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा समावेश आहे.