आरोग्य तज्ज्ञांनी जीवनशैलीत बदल आणि उत्तम आरोग्यासाठी प्लांट-बेस्ड डाएट घेण्याचे केले आवाहन
पुणे, 05 सप्टेंबर 2024: पुणे जिल्ह्यातील पुरुषांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. ‘निरोगी आरोग्य तरुणाचे, वैभव महाराष्ट्राचे’ कार्यक्रमांतर्गत 31.79 लाख पुरुषांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यात 5.53 लाख (17%) जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळले आहे.
उच्च रक्तदाब या आजाराला बऱ्याचदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. जागतिक स्तरावर अकाली मृत्यूचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जागतिक स्तरावर 4 पैकी 1 पुरुष आणि 5 पैकी 1 महिला यामुळे प्रभावित होतात. भारतातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे. जामा नेटवर्क ओपनच्या रिपोर्टनुसार, भारतात उच्च रक्तदाब असलेल्या 90%पेक्षा जास्त प्रौढांना उच्च रक्तदाबाचे एक तर निदान झाले नाही, त्यावर उपचार केले गेले नाहीत किंवा उपचार केले गेले, परंतु अनियंत्रित उच्च रक्तदाब आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेला ICMR अहवाल हे दर्शवितो की, सकस आहार आणि शारीरिक हालचालीमुळे कोरोनरी हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते आणि 80% टाईप 2 मधुमेह टाळता येऊ शकतो.
इंटर्नल मेडिसिन फिजिशियन आणि फिजिशियन कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिन (PCRM) सह प्रमाणित पोषणतज्ज्ञ डॉ. वनिता रहमान यांनी उच्च रक्तदाब व्यवस्थापित करण्यासाठी आहार आणि जीवनशैलीतील बदल करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. त्या म्हणाल्या, “किमान प्रक्रिया केलेले वनस्पती-आधारित पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये औषधांची गरज कमी होऊ शकते. कमीतकमी प्रक्रिया केलेल्या वनस्पती-आधारित पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि पोटॅशियम व फायबर भरपूर असतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या उच्च रक्तदाबाशी संबंधित इतर परिस्थितीमध्येही या पदार्थांमुळे फायदा होतो.”
प्रोग्रेस इन कार्डिओव्हस्कुलर डिसीजमधील अभ्यासात असे आढळून आले आहे की, प्लँड-बेस्ड आहारामुळे उच्च रक्तदाबाचा धोका ३४% कमी होतो. दुसरा अभ्यास हे दर्शविते की, हेल्दी प्लँट-बेस्ड डाएट इंडेक्स (hPDI) कमी रक्तदाबाशी संबंधित आहे, तर अनहेल्दी प्लँट-बेस्ड डाएट इंडेक्स (uPDI) उच्च रक्तदाबाशी संबंधित आहे.
लिंबूवर्गीय फळे, लसूण, भोपळ्याच्या बिया, पालक, बीन्स, मसूर, राजगिरा, पिस्ता, बेरी, बीट्स आणि गाजरचे पुरेसे सेवन केल्यास व सोबतच रिफाइंड धान्ये, साखर आणि मांस यांचा कमी वापर केल्यास रक्तदाब कमी होण्यास हातभार लागतो.
पुण्यात उच्च रक्तदाबाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. इतर जीवनशैलीतील बदलांसह प्लांट-बेस्ड डाएटकडे वळणे, या अदृश्य महामारीचा सामना करण्यासाठी आणि शहरातील सार्वजनिक आरोग्य परिणाम सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.