गुरुग्राम – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने न्यू डिस्ट्रीब्युशन केपेबिलिटीचा (एनडीसी) यशस्वीपणे समावेश केल्याचे जाहीर केले असून एयरलाइन डिस्ट्रीब्युशनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी ती पहिलीच कंपनी ठरली आहे.
एयर इंडियाने इंटरनॅशनल एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (आयएटीए) अत्याधुनिक २१.३ योजनेचा अवलंब केला असून त्याद्वारे प्रवासी एजंट, प्रवासी कंपन्या, लीझर आणि कामानिमित्त प्रवास करणारे यांना आपली उत्पादने रिटेल करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला जाणार आहे. एनडीसीमुळे एयर इंडिया आणि कंपनीच्या प्रवासी भागिदारांमध्ये जास्त प्रभावीपणे संवाद घडण्यास मदत होईल आणि पर्यायाने एकंदर बुकिंग व प्रवासाचा अनुभव उंचावेल.
एनडीसी हा प्रवास उद्योगाच्या सहकार्याने चालणारा उपक्रम आयएटीएने लाँच केला होता. नव्या एक्सएमएलवर आधारित डेटा ट्रान्समिशन स्टँडर्डचा विकास आणि बाजारपेठेत अवलंब करण्याच्या हेतूने हा उपक्रम लाँच करण्यात आला. एनडीसीमुळे एयरलाइन उत्पादनांचे विविध माध्यमांतील रिटेलिंगची पद्धत उंचावते. एयर इंडियाच्या प्रवासी भागिदारांना यामुळे विविध प्रकारच्या सेवा आणि ऑफर्स मिळणार असून त्यात खास तयार केलेली फ्लाइट पॅकेजेस, पूरक उत्पादने प्रत्यक्ष त्या त्या वेळेत उपलब्ध होतील. ग्राहकांना जास्त पारदर्शकतेसह सफाईदारपणे बुकिंग प्रक्रियेचा लाभ घेता येईल आणि सर्व विक्री चॅनेल्सद्वारे सर्वोत्तम डील्स मिळतील.
‘एनडीसीची अमलबजावणी हा एयर इंडियासाठी विक्रमी टप्पा असून कंपनीचा नाविन्यता आणि वितरण धोरण उंचावण्याचा प्रवास सुरू आहे. आमचे प्रवासी भागीदार आणि ग्राहकांना बुकिंगचा सफाईदार आणि प्रभावी अनुभव मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे,’ असे एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले.
एनडीसीमुळे एयर इंडिया आणि प्रवासी एजंट्स यातील संवाद क्षमता वाढेल आणि एयर इंडियाला खास तयार करण्यात आलेल्या ऑफर्स, पूरक उत्पादने व सेवा, किंमतींचे पर्याय जगभरातील प्रवासी विक्रेत्यांना लगेच उपलब्ध करून देणे शक्य होईल.
जगभरातील प्रवासी एजंट्सना थेट एयर इंडियाच्या एनजीसीशी कनेक्ट करून जास्त समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कंटेंट उपलब्ध होईल. त्यात एनडीसी एक्सक्लुसिव्ह ऑफर्स, पूरक सेवा आणि भाडेशुल्काचा समावेश असेल, जे पूर्वी पारंपरिक वितरण चॅनेल्सद्वारे उपलब्द केले जात नव्हते. यामुळे ग्राहकांसाठी एकंदर बुकिंग आणि प्रवासी सेवेचा अनुभव उंचावेल.
एयर इंडियाच्या ग्राहकांना जास्त सफाईदार, ऑनलाइन आणि ऑफलाइन पातळीवरील पारदर्शक बुकिंग प्रक्रिया यांचा लाभ होईल. यामुळे ग्राहकांनाही सर्वोत्तम डील्स व पर्याय मिळतील.
प्रवासी एजंट्सनी एयर इंडियाच्या एनडीसीशी कसे कनेक्ट व्हावे याविषयी अधिक माहितीसाठी किंवा ndc.airindia.com वर ndcdistribution@airindia.com एयर इंडियाच्या एनडीसी सपोर्ट टीमशी कनेक्ट व्हावे.