पक्की अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 26 ते 31 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन

Date:

पुणे दि.25:- पक्की अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 26 ते 31 ऑगस्ट रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत घेण्यात येणा-या पक्की अनुज्ञप्ती करीताच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या उददेशाने तसेच ज्या अर्जदारांचे शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत सप्टेंबर 2021 महिनाअखेर पर्यंत संपत असलेल्या अर्जदारांसाठी या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याची संबंधीत अर्जदारांनी नोंद घ्यावी व त्याप्रमाणे उपलब्ध ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची कार्यवाही पुर्ण करावी. त्या अनुषंगाने (स्लॉट बुकींग करुन) माहे ऑगस्ट 2021 मधील दिनांक 26.08.2021 ते 31.08.2021 रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 8.00 ते 11.00 पक्की अनुज्ञप्ती चाचणी करीता नियोजीत वेळेप्रमाणे हजर रहावे. पक्की अनुज्ञप्तीचा उपलब्ध कोटा 60 असून कोटा उपलब्ध होण्याची वेळ व दिनांक 26 ऑगस्ट 2021 ते 31 ऑगस्ट 2021 कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 ते 11 आहे.
तरी संबंधित सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते कि, चाचणीकरीता येताना चेह-यावर मास्क व हॅड ग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टंन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा...

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून...

पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, मग त्यांच्याशी क्रिकेट खेळता कसे?:राष्ट्रभक्ती की ढोंग?

मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट...

टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी!:सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्वरित माफी मागा- CM देवेंद्र फडणवीस

नागपूर-कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...