चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात केडन्स संघाची 67 धावांची आघाडी; व्हेरॉकचे पूना क्लबवर वर्चस्व

Date:

  • केडन्सच्या दिग्विजय पाटील (73धावा), आर्यन गोजे(51धावा) यांची अर्धशतकी खेळी

पुणे, दि.23 ऑक्टोबर  2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात टिळक जाधव(21-4) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाला 147 धावावर रोखले व सामन्यात 99 धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले. तर दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाविरुद्ध  67 धावांची आघाडी घेतली. 
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात केडन्स क्रिकेट अकादमी संघाच्या 18 षटकात 3 बाद 49धावापासून आज खेळ सुरु झाला. तत्पूर्वी काल क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 69.1 षटकात 199धावा केल्या होत्या. याच्या उत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 74.5 षटकात सर्वबाद 266धावा केल्या. यात दिग्विजय पाटीलने 82चेंडूत 13चौकार व 1षटकारासह 73धावा, शुभम खरातने 36 धावा यांनी सहाव्या गड्यासाठी 142 चेंडूत 97 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आर्यन गोजे 51, आर्या जाधव 31, तनिष्क खेडकर 22, प्रद्युम्न चव्हाण 18 यांनी धावा काढून संघाला 67 धावांची आघाडी मिळवून दिली. क्लब ऑफ महाराष्ट्रकडून  हमझा सय्यद(70-4), शुभम मेड(66-3), जयेश तांबे(15-2)यांनी सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आजदिवस अखेर 33षटकात 5बाद 80धावा केल्या. यात सारिश देसाई नाबाद 31, हमझा सय्यद नाबाद 0 धावांवर खेळत आहे. केडन्सकडून आर्य जाधवने 37 धावात 3 गडी बाद केले. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.  
आर्यन्स क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात काल व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 62 षटकात  सर्वबाद 246 धावा केल्या.  या आव्हानाचा पाठलाग करताना पूना क्लब संघाचा डाव 70.3षटकात सर्वबाद 147 धावावर कोसळला. यात वरद कुलकर्णी 36, अखिलेश गवळी 32,क्रिश शहा 24, अनिश जगताप 25 यांनी धावा केल्या. व्हेरॉक संघाकडून टिळक जाधवने 21 धावात 4 गडी, हर्षवर्धन पवार(10-2), रोहित चौधरी(26-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आज दिवसाखेर 36षटकात 4बाद 148धावा केल्या. यामध्ये टिळक जाधव नाबाद 35, नारायण डोके नाबाद 6 धावांवर खेळत आहे. 
सामन्याचा निकाल: पीवायसी मैदान: पहिला डाव:  क्लब ऑफ महाराष्ट्र: 69.1 षटकात सर्वबाद 199 धावा(नित्यय लुंकड 33(90,3×4,2×6), सारिश देसाई 35(69,4×4), शुभम मेड 31(73,4×4), स्वप्निल पाठाडे 26(46), अभिनव तिवारी 20, सय्यद हमजा नाबाद 19, रझिक फल्ला 16-63-7, शुभम खरात 19.1-45-2, सोहम सरवदे 13-20-1) वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 74.5 षटकात सर्वबाद 266धावा(दिग्विजय पाटील 73(82,13×4,1×6), आर्यन गोजे 51(92,9×4), शुभम खरात 36(78,7×4), आर्या जाधव 31(46), तनिष्क खेडकर 22, प्रद्युम्न चव्हाण 18, हमझा सय्यद 18.5-70-4, शुभम मेड 22-66-3, जयेश तांबे 9-15-2); पहिल्या डावात केडन्स संघाकडे 67 धावांची आघाडी;
दुसरा डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 33षटकात 5बाद 80धावा(सारिश देसाई नाबाद 31(46,5×4), सौरभ दरेकर 29(52), हमझा सय्यद नाबाद 0, आर्य जाधव 11-37-3, रझिक फल्ला 6-6-1, मोहम्मद अरकम सय्यद 5-10-1) वि.केडन्स:   
आर्यन्स क्रिकेट मैदान: पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 62षटकात सर्वबाद 246 धावा(यश 42(60,9×4), सुरज गोंड 48(62,8×4,1×6), टिळक जाधव 48(81,6×4), हर्षवर्धन खांदवे 30(47), अंश धूत 27, नारायण डोके नाबाद 20, राजमंथन काळे 11-34-5, अखिलेश गवळी 16-60-3, अशकन काझी 15-46-1) वि.पूना क्लब: 70.3षटकात सर्वबाद 147 धावा(वरद कुलकर्णी 36(86,5×4), अखिलेश गवळी 32(87,5×4),क्रिश शहा 24, अनिश जगताप 25, टिळक जाधव 15-21-4, हर्षवर्धन पवार 5.3-10-2, रोहित चौधरी 20-26-2); व्हेरॉक संघाकडे पहिल्या डावात 99 धावांची आघाडी; 
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 36षटकात 4बाद 148धावा(यश 46(51,9×4), सुरज गोंड 32(34,3×4,2×6), टिळक जाधव नाबाद 35(72,4×4), नारायण डोके नाबाद 6, सागर मल्लपटी 4-20-2, अशकन काझी 8-24-1) वि.पूना क्लब:

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...