पुणे-घरमालकाच्या घरातील साेने चांदीचे दागिने, राेख रक्कम व इतर माैल्यवान ऐवज चाेरी करणाऱ्या नाेकर व दाेन महिलांसह ५ जणांना आणि त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी ३ जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विराेधी पथक एकने जेरबंद केले असल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपी विराेधात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आराेपी सराफांच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंदू बालाजी मेडेंवाढ या नाेकरासह पोलिसांनी त्याचे इतर साथीदार सारिका आप्पासाहेब सावंत (रा.मुंढवा,पुणे, मु.रा.शेगाव, ता.जत, सांगली), भावना रविंद्र काेद्रे (रा.मुंढवा,पुणे), जनार्दन नारायण कांबळे (रा.शाहूनगर, सांगली), ऋषिकेश राजाराम ताेरवे (रा.काेसारी, ता.जत, सांगली) व दुर्गाचरण रविंद्र काेद्रे (रा.काेंढवा,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.
संबंधित चाेरीची घटना 29 ऑक्टाेबर राेजी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. सदर आराेपींकडे चाैकशी केली असता, त्यांनी चाेरी करण्यात आलेले साेने चांदीचे दागिने हे सराफ प्रवीण पाेपट दबडे, प्रतिम पाेपट दबडे व त्यांचा साथीदार महेश महादेव भाेसले ( सर्व रा.ढालगाव, ता.कवठे, महांकाळ, सांगली) यांना विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी साेनाराच्या ताब्यातून 22 लाख 80 हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहे. याप्रकरणी संबंधित गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विराेधी पथक एकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पाेकळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त (एक) गजानन टाेंपे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विराेधी पथकाचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सपाेनि अभिजीत पाटील, पाेऊनि विकास जाधव, यशवंत ओंबासे, पोलिस अंमलदार प्रविण ढमाळ, मधुकर तुपसाैंदर, प्रमाेद साेनवणे, रविंद्र फुलपगारे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्याधन गुरव, अमाेल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केलेली आहे.