अर्थसंकल्पावरील क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख यांची प्रतिक्रिया
पुणे- केंद्रीय अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांच्या गृहप्रकल्पाना करकपातीतून एक वर्षाची मुदतवाढ व गृहकर्जासाठी दीड लाखाच्या सवलतीत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हा अर्थसंकल्प गृहनिर्माण क्षेत्राला फारसा दिलासा देणारा नाही. पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये होणारी संभाव्य दरवाढ यामुळे बांधकाम साहित्यात देखील दरवाढ होणार आहे. याचा भार पर्यायाने ग्राहकांवर पडणार आहे.देशाला सर्वाधिक रोजगार देणाऱ्या क्षेत्राचा फारसा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.