Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अमेय वाघ दिसणार एकता कपूरच्या ‘बॉयगिरी – मेन विल बी बॉइज’ वेब सिरीजमध्ये

Date:

टीव्हीवर चालणा-या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल, तर आता तुमच्यासाठी एकता कपूर आणतेय, भन्नाट वेबसिरीज. एकताचं ‘ऑल्ट बालाजी’ प्रोडक्शन बॉयगिरी ही मालिका, मैत्री, मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा ह्यावर आहे.

 

नावाप्रमाणेच ‘बॉयगिरी’ मालिका आपल्याला ब्रोमॅन्सच्या विश्वात घेऊन जाते. एकत्र राहताना त्यांच्यातला घट्ट होत जाणारा ऋणानुबंध, त्याचवेळी ‘मेन नेव्हर ग्रो अप’ ह्या तत्वावर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं, पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका पाहताना प्रत्येक पुरूषाला त्याच्या स्वत:च्या तरूणपणीच्या मित्रांची आठवण नक्कीच होईल.

 

ह्या बॉयगिरीमध्ये प्रनवेश, अव्दैत, मनजोत, जतीन, रवी आणि बंदा अशी काही मनोरंजक पात्र दिसणार आहेत. ह्या सगळ्या मित्रांची मालिका दर एपिसोडगणिक मजेदार होत जाताना दिसेल. काही गंमतीशीर घटानाक्रमामध्ये अडकल्यावर व्यक्ति तितक्या प्रकृती ह्या न्यायाने ह्या मालिकेतली पात्र वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त होतात. तेव्हा पाहणा-याची हसून-हसून अक्षरश: मुरुकुंडी वळते.

 

अभिनेता अमेय वाघची ह्या मालिकेतली भूमिका एका खोडकर मुलाची आहे. ह्याविषय़ी तो अधिक सांगतो, “बॉयगिरी मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अगदी ख-या आयुष्यातले काही जवळचे मित्र ह्य़ा मालिकेसाठी एकत्र आलेत. दर प्रोजेक्टमध् काही वेगळं करणं, ही तर बालाजीची खासियत. आणि ऑल्ट बालाजीच्या सर्व मालिका हिट गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत करतील. बॉयगिरी मालिका ब्रोमॅन्सला अजून नव्या पातळीवर घेऊन जाईल. मी बज्जुच्या भूमिकेत तुम्हांला दिसेन. हा बज्जू आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेल्या सगळ्या जुगाडूंपेक्षा मोठा जुगाडू आहे. तुम्हांला गरज नसली तरीही तो दरवेळा मदतीला तत्पर असतो.”

 

बॉयगिरी मालिका लवकरच ऑल्ट बालाजी एपवर सुरू होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

265 मृतदेह रुग्णालयात आणले:DNA सॅम्पलिंग सुरू; PM मोदींचा घटनास्थळी दौरा

अहमदाबाद:एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये...

दोन्ही इंजिन बंद पडल्याने अपघात..मृत्यूच्या थरारक प्रवासाचा भारतासोबत अमेरिकाही करणार तपास..

६२५ फुटांवरून ४७५ फूट प्रतिमिनिट वेगाने… अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या...

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...