पुणे- सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे . कोरोना च्या दुसऱ्या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन आणि रक्ताची गरज निर्माण झाली होती.अजूनही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे .परंतु आज रोजी रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे त्याची गरज लक्षात घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने बाळासाहेब ठाकरे सभाग्रह सुपर बिबेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पुणे शहराचे सरचिटणीस व रीपाई चे ज्येष्ठ नेते बाबुराव घाडगे यांनी केले होते .
यावेळी अप्पर ,बिबवेवाडी परिसरातील नागरिकांनी विशेषतः युवकांनी या शिबिरात अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब जानराव ,पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे ,रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर , माजी नगरसेवक पिंटू धाडवे ,माजी अध्यक्ष अशोक कांबळे ,अशोकशिरोळे,शहर कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड,युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे ,श्याम सदाफुले हे मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमास. कार्यक्रमाचे आयोजन बाबुरावजी घाडगे, दयानंद शिंदे, पंकज बोरड, मयुर दिवेकर, शेखर मळेकर यांनी केले होते.