महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.. भाजपा अध्यक्ष योगेश गोगावले.

Date:

भाजपा शहर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष योगेशजी गोगावले व प्रदेश चिटणीस धीरजजी घाटे यांचा सत्कार पश्चिम महा. संघटन मंत्री रावि अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर, मुरलीधर मोहोळ, रमेश काळे, नगरसेविका मुक्ताताई टिळक, मनीषाताई घाटे, स्मिताताई वस्ते नगरसेवक दिलीप काळोखे, धनंजय जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश घोष व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमोर अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना मा. योगेश गोगावले बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या जनकल्याण योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची योजना असल्याचे सांगितले. महानगर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाल्याशिवाय मा. पंतप्रधानांच्या स्वप्नातील आपले पुणे साकारणे शक्य होणार नाही. २०१९ सालापर्यंत मा. पंतप्रधानांच्या योजनांची ८०% अंमलबजावणी पुणे शहरात झाली पाहिजे त्यासाठी महापालिकेवर भाजपा झेंडा फडकावू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांकडून सूचना घेण्यासाठी, भेटण्यासाठी, कामासंबंधी शहर कार्यालयात उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्र उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी वेळ देऊन निश्चित दिशेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई,...

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला...

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टर अपघात टळला; जुहू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती...