करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्त्यावर उतरणार; भाजप करणार आंदोलन

Date:

बीड-जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, करुणा शर्मा यांच्यावर अन्याय होत असल्याचे मत बीड भाजपने व्यक्त केले आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीडमध्ये भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आले, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

करुणा शर्मा प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका, सत्तेचा दुरूपयोग, गाडीत शस्त्र कुणी ठेवले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आजूबाजूला पोलिस दिसत आहेत. जिथे अन्याय तिथे भाजपा उभा राहणार करुणा शर्मा प्रकरण हे कौटुंबिक नसून आता ते सार्वजनिक झाले आहे. एखादी महिला शस्त्राने हल्ला कसा करेल करुणा शर्मा यांना यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयीन मदत मागितल्यास ती देखील करणार असल्याचे बीड राजेंद्र मस्के यांनी सांगितले.

याप्रकरणावर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे ट्वीटमध्ये काय म्हणाल्या ?
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची.. असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...