पुणे महापालिकेच्या विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व

Date:

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या चार विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज (बुधवारी) निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चारही समित्या जिंकल्या. महापालिकेच्या शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती,विधी व क्रीडा समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणुका घेण्यात आल्या. महात्मा फुले सभागृहात पालिकेच्या नवीन इमारतीत ही निवडणूक झाली.

निवडणुकीपूर्वीचे अंतिम वर्ष असल्याने सत्ताधारी भाजपने सर्व मतदारसंघातून प्रतिनिधित्व कसे मिळवायचे याचा प्रयत्न केला आहे.शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी आनंद रीठे व उपाध्यक्षपदी उमेश गायकवाड यांची निवड झाली तर विधी समितीच्या अध्यक्ष पदी बापूराव कर्णे गुरुजी व उपाध्यक्षपदी संदीप जऱ्हाड यांची निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी रुपाली धाडवे व उपाध्यक्ष पदी अर्चना मुसळे यांची निवड झाली. तर क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी अजय खेडेकर व उपाध्यक्षपदी ज्योती कळमकर यांची निवड झाली. भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी हे अध्यक्षस्थानी होते.नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, नगरसचिव शिवाजी दौंडकर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आईमाता मंदिरासमोर लिक्विड हिट केमिकल पीपलच्या गोदामातून क्लोरीन गळती:२२ नागरिक उपचारासाठी ससूनमध्ये

पुणे: मार्केट यार्डमधील गंगाधाम चौक ते बिबवेवाडी रस्त्यावरील एका...

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...