ज्येष्ठत्वाने पालिका कारभारावर लक्ष राहू द्या – आ.चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे- सभागृहनेता पदावरून अडीच वर्षे झाल्याने तुम्ही पायउतार झालात , तुमच्या कारकीर्दीबाबत कोणाच्या मनात शंका नाही , मात्र आता मी पदावर नाही म्हणून पालीअका कारभारापासून तुम्हाला अलिप्त राहता येणार नाहि ,आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर पालिकेच्या कारभारावर आपली पकड कायम ठेवा ,कारभारावर लक्ष राहू द्या असा सल्ला माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे  आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्याचे वृत्त आहे.

भिमाले कुटुंबीयांनी यावेळी त्यांचे  पुणेरी पगडी शाल देवून स्वागत केल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर झाले आहेत .

चंद्रकांतदादा यांनी भिमाले यांच्या निवास्थानी जावून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भिमाले हे विधानसभे साठी पर्वती मतदार संघातून इच्छुक होते .मात्र तिथे विद्यमान आमदार आणि भ्जाप्च्या शहराध्यक्ष माधुरी मिसाल यांना उमेदवारी मिळाली . मात्र याबाबत तक्रार न करता नाराजी व्यक्त न करता भिमाले यांनी मिसाळ यांना विजयी करण्यात हाथभार लावला .त्यानंतर पालिकेत त्यांचे सभागृहनेते पद देखील पक्षाने ठरविलेला कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार  सोडले . आणि पालिकेच्या सभागृहात विद्यमान नवनिर्वाचित सभागृहनेते धीरज घाटे यांच्या मदतीला ते उभे राहिले .या सर्व बाबींची योग्य दखल पक्षाने घेतल्याचे या पार्श्वभूमीवर मानले जाते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात

एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १०...

मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं.…..

-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई- संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी जे...

मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके

पुणे, दि. 13 : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना...

मतदानासाठी भरपगारी सर्वांनाच सुट्टी

पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निडणूकीसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी...