पर्वती मतदार संघ महायुती महामेळावा संपन्न

Date:

पुणे- लोकसभा मतदार संघाची महायुतीची उमेदवारी पुणे शहराचे पालकमंत्री  गिरीष बापट यांना जाहीर झाल्यापासुन पुणे शहरात युतीच्या प्रचाराच्या बैठकिना वेग आला आहे. महायुतीतील सर्वच घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्वच कार्यकर्त्यांचे मतदारसंघ निहाय मेळावे पुण्यातील सर्व मतदार संघात आयोजित करणात येत आहेत. पर्वती मतदार संघाचा महायुतीचा मेळावा काल रात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला. या मेळाव्याला पर्वतीतील युतीच्या सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, भाजपा शहर अध्यक्ष योगेश गोगावले, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दिपक उर्फ बाबा मिसाळ, माजी खासदार प्रदिप रावत, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे तसेच पर्वतीतील भाजपाचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, आरपीआय चे बाबुराव घाडगे व बाळासाहेब शेलार तसेच रासपचे बाळासाहेब पोकरे व स्वाती भातांब्रेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्वती मतदार संघ म्हणजे भाजपाला लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा मतदार संघ म्हणुन या मतदार संघाकडे पाहिले जाते. आमदार माधुरी मिसाळ यांच्या  नेतृत्वाखाली मतदार संघात भाजपाचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत.
   “सर्वच घटक पक्षांचे पर्वतीत चांगले काम असल्यामुळे सर्वाना सोबत घेऊन प्रचाराचे काम करु आणि युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य पर्वतीतूनच मिळवून देवु” असा निर्धार आमदार मिसाळ यांनी या वेळी बोलून दाखवला. कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना बापटम्हणाले “संघटन, संघटना आणि सहभाग या तिनही बाबतीत पर्वती मतदार संघाचे काम उत्तम आहे. या ही निवडणुकीत पर्वती मतदार संघ सर्व जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडेल यात शंका नाही.”
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मतदार संघाचे अध्यक्ष हरीष परदेशी यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...