पुणे- सिनिअर आहेत,पण आता त्यांना वयोमानानुसार दगदग होत नाही, पण त्यांना रिटायर करणे तर कठीण आहे ? सिनिअर लोकांचा सन्मान राखला पाहिजे , मग करणार काय ?
या प्रश्नावरचा तोडगा भाजपच्या कर्त्याधर्त्यांनी काढल्याचे सांगितले जाते . तो ही मोठा धक्कादायी आहे . गिरीश बापट यांना , ‘तुम्ही आता लोकसभेची तयारी करा ‘असे सांगून त्यांना मंत्रिपदातून मुक्त करण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या ऐवजी महेश लांडगे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घाण्यात येईल अशी हि चर्चा आहे . अर्थात या साऱ्या चर्चा गुजरात् च्या निवडणुकीमुळे मंत्रीपदाचा लांबलेल्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होत असल्या तरी .. गुजरात निवडणुकीनंतर काय वातावरण असेल ते मात्र आताच सांगता येणार नाही असाही दावा होतो आहे .अर्थात या चर्चा राजकीय पातळीवर बलाढ्य असलेल्या पक्षात होतातच ,पण त्या निव्वळ चर्चा असतात असे याबाबतच्या चर्चेला उत्तर बापट समर्थकांकडून दिले जात आहे .’बापट साहेब, जरा मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगून राज्यातील पेट्रोलचे दर कमी करा,”… असे विधान काल केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यात केल्याने , दिल्लीतून बापटांना विरोध होतो आहे कि मुंबईतून यावर ही खल होतो आहे. .