Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(व्हिडीओ)

Date:

पुणे-एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत केला . निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुंडांना भारतीय जनता पक्षाने प्रवेश देऊन पवित्र करुन घेतले आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे तर त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी हा संभ्रमात असलेला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव राष्ट्रवादी कनफ्युज पार्टी असे ठेवावे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाणेर, उत्तर डहाणूकर हाऊसिंग सोसायटी मैदान, सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्स, शिवसाम्राज्य चौक हडपसर अशा  चार ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी बाणेर येथील माऊली मंगल कार्यालय येथील पहिल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार विजय काळे आणि भाजप उमेदवार उपस्थित होते.
पुणे शहरामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्या सुटणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. लोकसंख्या आणि अनधिकृत बांधकामामुळे शहराचा बकालपणा वाढला असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही ही परिस्थिती सुधारुन पायाभूत सुविधांचा विकास करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही हे शहर स्मार्ट करू असे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण रिंगरोडच्या कामाला गती मिळवून देऊ असे ते म्हणाले. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न असो वा इतर कुठलाही प्रश्न असो भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता द्या आम्ही तो सोडवून देऊ असे ते म्हणाले. येत्या तीन वर्षात पुण्याला देशाचे स्टार्ट अप कॅपिटल करू असे ते म्हणाले. त्याबरोबरच पुणे शहरात वायफायची सुविधा उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले. पुण्यात मेट्रो आणि बस यांचे आम्ही ईंटीग्रेशन करणार. एकाच तिकीटावर मेट्रो आणि बसमधे प्रवास करता येईल. ईंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आम्ही तयार करू. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली.  पिंपरी-चिंचवडही राष्ट्रवादीकडे राहणार नाही. आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आहे. काँग्रेसचे तर अस्तित्वच दिसत नाही असे ते म्हणाले. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कुठे कुणासोबत युती करायला मिळते का असा विचार आमचा ‘मित्रपक्ष’ करत आहे असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....