मुंबई दि. ७ जुलै – ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे . एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
खडसे म्हणाले की, माझ्यावरील कारवाईमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होतं नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरं जायला हवं.
कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढुन आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातुन संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपलं निर्दोषत्व सिद्ध करत कोणत्याही चौकशीला सहकार्य करणं उत्तम ठरेल असे मत दरकेर यांनी व्यक्त केलं.