सेवा हैं यज्ञकुंड…
काव्याच्या या ओळींनी जीवन समर्पित करणारे संस्कार स्वीकारून राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी स्वखर्चाने २०२० धान्य किट पक्षाच्या वतीने मोफत वाटपाचा संकल्प सोडला आहे. ज्याचा शुभारंभ आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.
आज करोनाच्या वैश्विक संकटाशी आपण सगळेच दोन हात करत आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे मनपा पुणे जिल्हा परिषद तसेच सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स सगळ्यांनी या युध्दात उडी घेतली आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, कार्यकर्ते, गणपती मंडळे सगळेच आपल शहर राज्य आणि देश वाचवायला पुढे सरसावले आहेत.
राघवेंद्र बाप्पू मानकर यांनीही या संकटाशी सामना करण्यात पाहिल्या दिवसा पासून कामाला सुरुवात केली आहे. पुणे मनपा विलगीकरणं कक्षातील नागरिकांना सकाळच्या चहा नाष्ट्या पासून रात्रीचे जेवण असो, पोलिस बांधवांना चहा जेवण असो, पहाटे स्वच्छता कर्मचारी भगिनींना चहा नाष्टा असो, लॉक डाऊन साठी बॅरिगेटिंग असो किंवा येरवडा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला मास्क आणि सेनिटायझर पुरवणे असो जी मदत मागितली गेली ती पूर्ण करण्याचा यत्न केला .
आता या पुढे लॉक डाऊन अजुन काटेकोर पणें पाळणे अत्यावश्यक झाले आहे कारण वाढणार आकडा. त्यामुळे सर्व किराणा दुकाने ठराविक वेळेत उघडी असणार आहेत परंतु अश्या काळात बरेच असे लोक असतील की ज्यांच्याकडे दुकानं उघडी असून पण समान खरेदी साठी पैसे नसतील. म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्या कडून भारतीय जनता पक्ष यंत्रणेतून २०२० धान्य किट शहरातील गरजू कुटुंब आणि महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि नोकरी साठी शहरात वास्तव्यास असणारा युवा वर्ग यांच्या साठी तयार करून प्रशासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि पालन करत वाटण्यात येणार आहेत. आज या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला.