आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आमदार निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ

Date:

पुणे-

कोरोनामुळे ठप्प असलेल्या विकासकामांना गती मिळाली असून, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विकासनिधीतून कोथरुड, बाणेर पाषाणमधील विविध विकासकामांचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. यात प्रामुख्याने ड्रेनेज लाईन टाकणे, विद्यार्थी व महिलांसाठी अभ्यासिका बांधणे, पाण्याची टाकी बसवणे यांसह विविध विकासकामांचा समावेश आहे.

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या विकासनिधीतून अनेक विकासकामे मंजूर झाली असून, त्यापैकी काही कामांचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 12 मधील वनाज शाळा- कोथरुड येथे पाण्याची टाकी बसवणे, प्रभाग 8 येथील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात महिलांसाठी शौचालय उभारणे, प्रभाग 13 मध्ये सिटी क्राऊन सोसायटी येथे ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग 13 मधीलच स्नेहा सहकारी संस्था म्हाडा कर्वेनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण, प्रभाग क्रमांक 12 मधील वनाज शाळा येथील शौचालयाचे नुतनीकरण, प्रभाग क्रमांक 12 डहाणूकर कॉलनी मधील लक्ष्मीनगरमधील गल्ली क्रमांक 1 ते 22 मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे, प्रभाग क्रमांक 9 पाषाण मधील पंचशील नगर येथे सामाजिक सभागृहाच्या पहिल्या मजल्याचे बांदकाम, प्रभाग 12 डहाणूकर कॉलनी मधील लक्ष्मीनगर येथील निळा झेंडा चौक येथे स्वच्छता गृहावरील विद्यार्थी व महिलांसाठी अभ्यासिका बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी बाणेर आणि पाषाण भागातही आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आमदारनिधीतून सहा बस स्टॉप उभाराण्यात आले. तर बाणेर-नणावरे वस्ती येथे ओपन जिम उभारण्यात आली असून, त्याचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपणा शिकवू नये अशा...

टिपू सुलतान श्रीरामाचे नाव असणारी अंगठी घालत होता:भाजपचे पूर्वी टिपूवर प्रेम होते, आता तो त्यांच्यासाठी वाईट झाला – काँग्रेसचा दावा

मुंबई-काँग्रेसने टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याच्या मुद्यावरून...

पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, मग त्यांच्याशी क्रिकेट खेळता कसे?:राष्ट्रभक्ती की ढोंग?

मुंबई- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट...

टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी!:सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्वरित माफी मागा- CM देवेंद्र फडणवीस

नागपूर-कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...