पुणे-महाराष्ट्रातील अनेक वर्षांच्या आषाढी वारी परंपरेचे औचित्यनिमित्त मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज भवानी पेठ येथील ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या पादुकेचे दर्शन घेतले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. अमित शहा यांनीही दर्शन घेतले.
आज पुणे येथील विठोबा मंदिर देवस्थान येथे त्यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खा.रावसाहेब दानवे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक,नगरसेवक अजय खेडेकर आदी उपस्थित होते.
याशिवाय भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, गोरख भिकुले, प्रमोद बेंगरूट, रत्नाकर हरिश्चंद्रे, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुलोचनाताई कोंढरे हेही उपस्थित होते. दर्शनानंतर देवस्थानच्यावतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस, श्री. अमित शहा, श्री. दानवे यांचा सत्कार करण्यात आला.