बाल दहशतवादावर भाष्य करणार्‍या ‘बिल्लू उस्ताद’ हिदी सिनेमाचा मुहूर्त

Date:

aangre1
पुणे:
बाल दहशतवादाची समस्या आणि त्यावरील भाष्य मांडणारा पहिला हिंदी सिनेमा ‘बिल्लू उस्ताद’ चा मुहूर्त पुण्यातील ‘आर्यन स्कूल’ परिसरात पार पडला. ‘नारायण फिल्मस्’ तर्फे तयार होत असलेल्या या फिल्मची निर्मिती शंतनू सिंह यांनी केली असून, सुवाहदन आंग्रे हे दिग्दर्शन करीत आहेत.
मुहूर्त प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रावण कुमार, ‘महाराष्ट्र अ‍ॅण्टी टेररीझम स्क्वाड’चे सहायक पोलीस आयुक्त भानू प्रसाद बर्गे, महापौर दत्तात्रय धनकवडे, पोलीस निरीक्षक तांबे, लेखक मनोज पांडे, अभिनेत्री मिथिला नाईक, स्नेह अरुण उपस्थित होते.
अनाथाश्रमात राहणारा धाडसी मुलगा ‘बिल्लू’ आणि त्याच्या बरोबरचा मित्र यांच्याभोवती हा सिनेमा फिरतो. त्यांचे अपहरण दहशतवादी करतात आणि त्यांना दहशतवादी कारवायांना प्रवृत्त करतात. या कारवाया पुढे बिल्लू कशा हाणून पाडतो, यावर चित्रपटाची कथा आहे.
प्रियांशू चॅटर्जी, मिथिला नाईक हे मुख्य भूमिकेत आहेत. संगीत दिग्दर्शन श्रीरंग आरस यांनी केले आहे. गीते सचिन निकम व दिनेश मंग्रा यांची आहेत.
 ‘विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण समाजाला संदेश देणार्‍या सामाजिक चित्रपटाची निर्मिती हे माझे स्वप्न होते.’ असे निर्माते शंतनू सिंह यांनी सांगितले.
सुवाहदन आंग्रे म्हणाले, ‘अत्यंत वेगळ्या विषयावरची ही निर्मिती आहे. अनाथगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यथाही या निमित्ताने सर्व प्रेक्षकांसमोर येतील आणि हा चित्रपट सर्वांना अंतर्मूख करेल’ असे मनोगत दिग्दर्शक सुवाहदन आंग्रे यांनी व्यक्त केले.
या चित्रपटासाठी कैलास खेर, वैशाली सामंत यांच्या गाण्याचे ध्वनीमुद्रण देखील पूर्ण करण्यात आले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण...

ट्रम्प यांची रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर हल्ला:अनेक उड्डाणे डायव्हर्ट, ट्रम्प...