महिनाभरात गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन-महापौर मुरलीधर मोहोळ

Date:

पुणे : सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गदिमांच्या 101 व्या जयंती वर्षात डिजिटल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. 
नियोजित स्मारकाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी महापौर बंगल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माडगूळकरांचे नातू सुमित्र माडगूळकर, नातसून प्राजक्ता माडगूळकर, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीतील 6.27 एकरमध्ये महापालिकेतर्फे प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ 25110 चौ.मी. असणार आहे. इमारतीच्या समोरच्या बाजूला गदिमांचे स्मारक उभाण्यात येणार आहे. या स्मारकात बांधकाम क्षेत्र सुमारे 931 चौ.मी. असणार आहे. स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांचा जीवनप्रवास आणि त्यांनी लिहिलेले साहित्याची माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, गदिमांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटांचे दालन, डिजिटल दालन, सभागृह आणि व्यवस्थापन कक्षाचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन केंद्र तळमजला अधिक त्यावर तीन मजले असे असणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

कर्मभूमीत स्मारक ही तर कुंटूबाची इच्छा
मागील 43 वर्षांपासून माडगूळकर कुंटूब गदिमांच्या स्मारकासाठी झगडत होते. 2019 हे गदिमांचे जन्मशताब्दिवर्ष होते. त्या वर्षात स्मारक उभारले असते, तर अधिक आनंद झाला असता. मात्र गदिमांच्या 101 जयंती वर्षात या स्मारकाच्या कामाला प्रारंभ होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारले जावे. ही माडगूळकर कुंटूबाची इच्छा होती. गदिमांच्या 101 व्या स्मृतीदिनानिमित्त राज्य, देश आणि विदेशातील साहित्यिक त्यांच्या साहित्याचे सामुहिक वाचन करणार आहेत. त्यातही माडगूळकर कुंटूंब सहभागी होणार आहे. महापौरही त्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अशी भावना गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...