मुंबई-खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अटकेच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दोन ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
राणा दामप्त्यावर पोलिसांनी भादंवि कलम 153 (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमे देखील लावण्यात आलेले आहेत. आमदार रवी राणांनी खार पोलिस ठाण्याच्या पायऱ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, आणि हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.