Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बीन संस्कारी सून स्मृती ईराणींना फिरणे मुश्कील करू-संगीता तिवारींचा इशारा

Date:

 पुणे- पंतप्रधानपदाचा त्याग करणाऱ्या सोनिया गांधी आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या गांधी परिवाराचा अपमान केला तर खबरदार ,देशासाठी लढ्लेल्या कुटुंबाला असा त्रास देणे बंद करा अन्यथा तुम्हाला फिरणे मुश्कील करू अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी खणखणीत इशारा दिला आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ कमजोर आहोत असा घेऊ नये असेही त्या म्हणाल्या .स्मृती इराणी यांच्या प्रतिमेला जोडे मारून यावेळी महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला .

   अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा  सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान केला. स्मृती ईराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते या कृत्याच्या निषेधार्थ आज महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ‘माफी माँगो माफी मांगो स्मृती ईराणी माफी मांगो, भ्रष्टाचारीणी स्मृती ईराणी या घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्‍यवहारे, रजनी त्रिभुवन,लता राजगुरू, सुजाता शेट्टी, संगीता पवार, स्वाती शिंदे, सिमा सावंत, सुंदरा ओव्‍हाळ, ताई कसबे, नंदा ढावरे, पपिता सोनावणे, सुजाता नेमुर, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, छाया जाधव, आयेशा शेख, सिमा महाडिक, प्राजक्ता गायकवाड, अंजू डिसुझा, अश्विनी गवारे, ॲड. रूकसाना पठाण, सुरेखा माने, रूकसाना शेख आदींसह असंख्य महिला कार्यकर्त्यां या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

      या प्रसंगी निषेध व्‍यक्त करताना संगीता तिवारी म्हणाल्या की, ‘‘बेकायदेशिरपणे बार चालविणाऱ्या स्मृती ईराणीने आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल माफी माँगो हे बोलणे हस्यास्पद आहे. सोनिया गांधी या त्यागमूर्ती असून देशाचे पंतप्रधान पद त्यांनी सोडून दिले. स्मृती ईराणी या स्वत: कोणत्या क्षेत्रातून आल्या आहेत आणि आपल्या मुलीला कोणत्या क्षेत्रात त्यांनी उभी केले आहे हे आधी त्यांनी पहावे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टिका केलेली आम्ही कदापीही सहन करणार नाही. बीन संस्कारी सून स्मृती ईराणी जर पुण्यामध्ये आल्या तर आम्ही त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू.’’

      यानंतर पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यावेळी म्हणाल्या, ‘‘संसदेमध्ये झालेला प्रकार हा निदंनीय आहे. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असून त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वागणूक झाली तर आम्ही कदापीही सहन करणार नाही. सोनिया गांधी या नुकत्याच आजारातून बाहेर पडलेल्या असताना ज्या पध्दतीने स्मृती ईराणी संसदेत त्यांच्याशी वागल्या हे बघितल्यावर लक्षात येते की, गोव्‍यामधील अवैध दारू व्‍यवसायात झालेल्य बदनामीला लपविण्यासाठीच हे कृत्य स्मृती ईराणी यांनी केले. त्यामुळेच आज पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मृती ईराणी यांचा आम्ही ‘जोडो मारो आंदोलन’ करून निषेध करीत आहोत.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...