लोकमान्य टिळकांविषयी वादग्रस्त उल्लेख राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ या धड्यात टिळकांचा उल्लेख आहे. देशाला टिळकांनी चळवळीचा मार्ग दाखवल्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात.असे या पुस्तकात नमूद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारचा निषेध करण्यासाठी केसरी वाडा येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून निदर्शने करून राजस्थान सरकारचा निषेध करण्यात आला, यावेळी काँग्रेस नेते रोहित टिळक , पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल , जयकुमार ठोंबरे , द. स. पोळेकर , विश्वास दिघे ,सुरेश कांबळे, सतीश कांबळे, विनय ढेरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अमित बागुल म्हणाले ,फादर ऑफ टेररिझमअशा शब्दाचा वापर एखाद्या महान व्यक्तींविषयी कसा काय केला जाऊ शकतो? भाजपच्या सरकारकडून असे कारस्थान जाणीवपूर्वक रचले जात आहे, मात्र ते कधीच यशस्वी होणार नाही. या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले.
लोकमान्यांचा अवमान कदापी सहन करणार नाही – राजस्थान सरकारचा निषेध
पुणे -लोकमान्य टिळक यांचा राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या रेफरन्स बुकमध्ये अपमान केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने पुणे शहर काँग्रेसकडून राजस्थान सरकारचा केसरीवाडा येथे निषेध करण्यात आला आणि कोणत्याही परिस्थितीत लोकमान्यांचा अवमान सहन करणार नाही असा इशाराही देण्यात आला.