अमित बागुल मित्रपरिवाराचा उपक्रम
पुणे ; समाजरक्षणासाठी सदैव कटिबद्ध असणारे पोलीस बांधव , ममता फाऊंडेशन कात्रज येथील मुलींसमवेत आणि अंध भगिनींच्या जीवनाला आधार देण्याबरोबरच पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षांना राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी राबविला.
दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोलिस बांधवांबरोबर रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आम्ही सदैव तुमच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पोलीस बांधवानी यावेळी दिली. याप्रसंगी दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे ,गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ व पोलीस बांधव उपस्थित होते. कात्रजमधील ममता फाऊंडेशन कात्रज येथील मुलींसमवेत तसेच अंध भगिणींबरोबर रक्षाबंधन साजरे करून अमित बागुल आणि मित्रपरिवाराने आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत असे वचन दिले. त्यानंतर राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलसमोरील वृक्षाला राखी बांधून पर्यावरणासाठी कटिबद्ध होऊ या , वसुंधरा वाचविण्यासाठी कृतिशील होऊ याचा निर्धार केला. या अनोख्या उपक्रमात महेश ढवळे , सागर आरोळे, धनंजय कांबळे, अमर ससाणे , बाबालाल पोळके , संतोष पवार , इम्तियाज तांबोळी , विक्रांत गायकवाड , गणेश गायकवाड, दीपक गावडे , गोरख मरळ , कुणाल आरडे , सिद्धांत भडकवाड आदींसह पदाधिकारी -कार्यकर्ते सहभागी झाले होते.