SHARAD LONKAR

58421 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

शाश्वत विकास ध्येये आणि महिलांवरील हिंसाचार निर्मूलन: मुंबईत उपसभापती कार्यालय व स्त्री आधार केंद्र तर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न मुंबई, १८ मार्च २०२६: शाश्वत विकास उद्दिष्ट(SDG)...

एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, विखे-पाटलांचे भविष्य पाहणारा अशोक खरात बलात्कार प्रकरणी गजाआड

नाशिक – कॅप्टन अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. त्याला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल....

सुट्ट्यांच्या दिवशीही दस्तनोंदणी कार्यालये सुरू राहणार

मुंबई : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई...

“मैं वापस आऊंगा”  12 जून ला चित्रपटगृहांमध्ये

टीझर रिलीज झाल्यापासून ““मैं वापस आऊंगा”” हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे आणि इम्तियाज अली यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथनशैलीची झलक प्रेक्षकांना देत आहे। समकालीन हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतागुंतीचे आणि...

पुण्याच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागात १७लाख चौ. फुटांचा मोठा‘अ’दर्जाचा प्रकल्प…

पुणे, १८ मार्च २०२६ : अवांते स्पेसेस लिमिटेड या किर्लोस्कर उद्योगसमुहातील कंपनीने आज पुण्याच्या ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये १७ लाख चौ. फूट क्षेत्रफळाचा उच्च दर्जाचा व्यावसायिक प्रकल्प उभारीत असल्याची घोषणा आज केली. या प्रकल्पाचे नाव ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ असे असेल. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात कंपनीच्या विस्तारासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यातील व्यावसायिक परिसराचा भविष्यातील विकास घडवण्याच्या उद्देशाला कंपनीच्या या प्रकल्पामुळे अधिक बळ मिळणार आहे. हा प्रकल्प मोठ्या व्यावसायिक कॅम्पसच्या स्वरूपात विकसित केला जात आहे. कंपनीने जागेची निवडही धोरणात्मक पद्धतीने केली असून, देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मध्यवर्ती ठिकाणी उत्तम कार्यालयीन सुविधा मिळाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पातून कंपनीला सुमारे २०० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे. तीन बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर आणि त्यावर २० मजले (३बी+जी+२०) अशी या प्रकल्पाची रचना आहे. प्रत्येक मजल्यावर साधारण ८५,००० ते ९५,००० चौ. फूट इतकी भाड्याने देता येणारी जागा उपलब्ध असेल. तसेच, एकाच मजल्याचे चार भाग करता येतील. यामध्ये प्रत्येक भाग १३,००० ते ३०,००० चौ. फूट इतका असेल. त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार जागा घेण्याची लवचिकता मिळेल. प्रकल्पाभोवती भरपूर हिरवळ असणार असल्यामुळे आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक वातावरण यांचा चांगला समतोल मिळेल. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी), आयटी, बीएफएसआय, अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, तसेच को-वर्किंग आणि फ्लेक्सिबल स्पेस देणाऱ्या संस्थांसाठी आणि दीर्घकाळासाठी जागा शोधणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी हा प्रकल्प योग्य ठरेल. प्रकल्प २०२७च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पुण्याच्या मध्यभागी असलेल्या या ‘अवांते बिझनेस पार्क’ला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कर्वे रस्त्यावरील स्वतंत्र बोगद्यामुळे, तसेच कर्वे रस्ता, कॅनॉल रस्ता आणि नव्याने बांधलेल्या डीपी रोडमार्गे येथे ये-जा करणे सोपे होईल. या प्रकल्पात सुमारे एक लाख चौ. फूट क्षेत्रात खाद्यपदार्थ व रिटेल या सुविधा असतील. यामध्ये ‘फूड कोर्ट’चाही समावेश आहे. याशिवाय बहुपयोगी प्रशिक्षण कक्ष, सामायिक बैठक कक्ष, व्यायामशाळा, पाळणाघर आणि क्लिनिक यांसारख्या सुविधा दिल्या जातील. प्रकल्पात मोकळी हिरवी जागा, झाडा-झुडपांची जागा आणि ‘ओपन एअर अॅम्फीथिएटर’ही असेल. त्यामुळे कामासाठी एक संपूर्ण, आरामदायी आणि उत्पादक वातावरण तयार होईल. त्यातून कर्मचाऱ्यांचे समाधान होऊन त्यांची कार्यक्षमता वाढेल. या प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरकता लक्षात घेण्यात आली आहे. हा प्रकल्प ‘आयजीबीसी प्लॅटिनम’ आणि ‘यूएसजीबीसी प्लॅटिनम’ या दर्जांसाठी प्री-सर्टिफाइड असून, ‘वेल प्रमाणपत्र’ मिळवण्याचे लक्ष्य त्यात ठेवण्यात आले आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी याबाबतची कंपनीची बांधिलकी दिसून येते. ऊर्जा कार्यक्षम अशी सेंट्रलाइज्ड एचव्हीएसी प्रणाली, उष्णता कमी राहील व नैसर्गिक प्रकाश जास्त मिळेल अशा पद्धतीने केलेले साधे फ्लोअर डिझाइन, उत्तम इनडोअर-आउटडोअर वातावरण आणि मोठ्या प्रमाणात हिरवी मोकळी जागा अशी या प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे परिसरातील वातावरण संतुलित ठेवण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना ‘अवांते स्पेसेस लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पोरायथ म्हणाले, “अवांते स्पेसेसच्या वाढीच्या प्रवासात ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. मोठ्या शहरांमध्ये जागतिक कंपन्या आणि जीसीसी यांच्याकडून मोठ्या ऑफिस स्पेसची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन, उच्च दर्जाची आणि पर्यावरणाची जबाबदारी जपणारी व्यावसायिक पायाभूत सुविधा उभारण्याची ही मोठी संधी आम्ही घेतली. पुण्यातील आमच्या पहिल्या प्रकल्प वन अवांते या प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही हा पुढील प्रकल्प विकसित करीत आहोत. आमचे हे प्रकल्प किर्लोस्कर समुहाच्या मूल्यांशी आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत असतील. तसेच, परिसरातील भरपूर हिरवळ जपून, संतुलित आणि शाश्वत वातावरण तयार करण्यावरही आमचा भर असेल.” या प्रकल्पासाठी दीर्घकालीन भाडेपट्ट्याचे, म्हणजे लिजिंगचे धोरण अवलंबले जाणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात उच्च दर्जाच्या ऑफिस सुविधा शोधणाऱ्या मोठ्या आणि संस्थात्मक कंपन्यांवर याकरीता विशेष लक्ष दिले जाईल. प्रकल्पाच्या बांधकामाच्या काळात आणि तो सुरू झाल्यानंतरच्या कामकाजाच्या काळात मिळून सुमारे १५ हजार जणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. ‘अवांते बिझनेस पार्क – कोथरूड’ या प्रकल्पामुळे ‘अवांते स्पेसेस’ची प्रीमियम कमर्शियल रिअल इस्टेट क्षेत्रातील पकड अधिक मजबूत...

Breaking

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...
spot_imgspot_img