पुणे-ए.टी.एस चे ए.सी.पी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अशी धमकी आल्याने दहशतवादाविरुद्ध एकजुट दाखवण्यासाठीआज पुण्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दहशतवादाचा निषेध करणारा मोर्चा काढला .
ए.टी.एस चे ए.सी.पी भानुप्रताप बर्गे यांना व त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू अश्या आशयाचा ई-मेल आयसीस या दहशतवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना आला आणि पुण्यातील तरुणाई अस्वस्थ झाली. देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढणारे बर्गे साहेबांसारखे धडाकेबाज अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना जर दहशतवादी धमकावणार असतील तर हे अधिकारी किवा पोलिस कर्मचारी एकटे नाहीत तर त्यांच्या पाठीशी सर्व नागरिक ठामपणे उभे आहेत हे दाखवून देणे गरजेचे आहे अश्या आशयाचा मेसेज संदीप खर्डेकर यांनी whatsapp वरील पुणे विद्यार्थी चळवळ या ग्रुप वर टाकला आणि त्यावर मनसे चे प्रशांत कनोजिया यांनी त्वरित एक मोठी रेली काढावी असे सुचवून त्यादृष्टीने निरोप देण्यास व नियोजन करण्यास सुरुवात केली.अल्पावधीतच पुण्यातील विविध राजकीय पक्ष,संस्था,संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या ग्रुप वर प्रतिक्रिया यायला लागल्या व कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे भेटायचे ठरले.त्यानुसार मनसे चे प्रशांत कनोजिया,नगरसेवक राजू पवार,रवि बनसोडे,अमोल शिंदे,भाजप चे सरचिटणीस संदीप खर्डेकर,दिलीप उंबरकर,भाजयुमो चे अध्यक्ष गणेश घोष,अल्पसंख्यांक आघाडी चे सरचिटणीस सद्दाम शेख,समर्पण युथ फोरम चे पंकज काळे,उमेश भेलके,ऋषिकेश कुंबरे ,काँग्रेस चे विशाल भेलके,शिवसेनेचे गजानन थरकुडे,राजेश पळसकर, पोलिस मित्र संघटनेचे जयराज लांडगे,राष्ट्रवादी काँग्रेस चे इक्बाल शेख,महापेरेंट्स पालक संघटनेचे चे दिलीपसिंग विश्वकर्मा,बाबा चौकसे सारसबाग मित्र मंडळ,महाराष्ट्र नागरिक कृती समिती सुरेश जैन, पतित पावन संघटनेचे सीताराम खाडे,मनोज नायर,स्वप्नील नाईक,दिनेश भिलारे,अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे विश्वजीत देशपांडे,आनंद दवे,सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील,सुदर्शन मित्र मंडळ चे श्याम मारणे ,नेक्स्ट जनरेशन चे बाबा शेख, यासह विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी सावरकर स्मारक येथे बैठक घेऊन चर्चा केली.यानंतर सर्वानुमते रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी दहशतवाद निषेध रेली चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार आज सकाळी बालगंधर्व चौकात मोठया प्रमाणावर नागरिक येण्यास सुरुवात झाली.सर्वपक्षाचे व सर्व धर्माचे नागरिक दहशतवादाविरुद्ध एकजुट दाखवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आले.खा.वंदना चव्हाण,आ.माधुरी मिसाळ,आ.मेधा कुलकर्णी,आ.जगदीश मुळीक,कोंग्रेस चे शहराध्यक्ष अभय छाजेड,मोहनदादा जोशी,आर.पी.आय चे शहराध्यक्ष महेंद्र कांवळे, शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण,नगरसेवक दीपक मानकर,बाळासाहेब बोडके,मानसी देशपांडे,मुक्ता टिळक,मनीषा चोरबेले,दत्ता खाडे,मनसे चे किशोर शिंदे,रविंद्र धंगेकर,सुशीला नेटके,पुष्पाताई कनोजिया,बाळासाहेब शेडगे,राजु पवार,शिक्षण मंडळ सदस्य मंजुश्री खर्डेकर,रवी चौधरी,यासह अनेक मान्यवर नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेवर क्रुष्णा यादव यानी तयार केलेल्या समईतील दीप प्रज्वलित करुन या मूक मोर्च्यास प्रारंभ करण्यात आला.(सदर समईवर जगाचा नकाशा व त्यावर सर्व धर्मचिनह अंकित करण्यात आले आहेत.)
यावेळी संयोजक संदीप खर्डेकर,प्रशांत कनोजिया यांच्यासह बाबाशेठ मिसाळ,बाबा शेख,इकबाल शेख,कादर शेख,मेहबुब शेख, ई उपस्थित होते.
या मूक मोर्च्याचा समारोप सावरकर स्मारक येथे करण्यात आला.यावेळी आ.मेधा कुलकर्णी,आ.माधुरी मिसाळ,मा.विनायक निम्हण,आ.जगदीश मुळिक,पुष्पाताई कनोजिया,हिंदकेसरी अमोल बुचडे,यानी आपले मनोगत व्यक्त करताना दहशतवाद्यांचा निषेध केला व दहशतवादाविरुद्ध च्या लढयात सर्व पुणेकर एकदिलाने ठामपणे उभे आहेत अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविक संदीप खर्डेकर यानी केले तर आभार व समारोप प्रशांत कनोजिया यानी केले.