राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस-खळबळ

Date:

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुण्यातील बाणेर भागातील विश्वासू विद्यमान नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं उघड झालं आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुंडाला देण्यात आली होती. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा मुलगा समीर याला तुमच्या वडीलांना मारण्यासाठी काही मुले बाणेर येथे आली आहेत असा एक फोन आला होता. माहिती मिळाल्यानंतर चांदेरे यांच्या घराच्या बाहेरील बाजूस एका चारचाकी वाहनात काही जण दबा धरुन बसलेले दिसले. चांदेरे यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कोण पाहिजे अशी विचारणा केली असता त्यांनी काही न बोलता गाडी निघून गेले. यानंतर येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी अनिल यशवंते याचे साथीदार जीवे ठार मारण्यासाठी आल्याचे तक्रारदारकडून सांगण्यात आले. त्यानुसार संबधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखील तपास सुरू असल्याचे चतुःशृंगी पोलिसांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संपूर्ण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद…

पुणे : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून...

लेखणी कागदावर अंकित होते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो; इतिहास रचला जातो : पद्मश्री शेखर सेन

पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे...

खारघर, कळंबोली व पनवेल येथे अभिनय शिबिरांचे आयोजन

पनवेल महानगरपालिका व अ.भा. नाट्य परिषद शाखा- पनवेल यांच्या...