विश्वनाथन आनंद खेळले एकाचवेळी बारा विद्यार्थ्यांबरोबर बुद्धीबळ

Date:

  • या स्पर्धेत ५ ते १६ या वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग
  • अंतिम फेरीसाठी ४८६ पैकी १२ विद्यार्थांची निवड
  • स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

पुणे-एडिफाय इंटरनॅशनल स्कूलने पुणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक अनोख्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी आपली हजेरी लावली. या स्पर्धेची खासियत अशी होती की अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १२ विद्यार्थ्यान बरोबर विश्वनाथन आनंद यांनी बुद्धिबळचा सामना खेळला. हा खेळ एडिफाय इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेत ५ ते १६ या वयोगटातील एकून ४८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेची प्रारंभिक फेरी ही दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आली होती. अंतिम १२ स्पर्धकांनमध्ये अद्वैत पाटील, कशिष जैन, शिवराज पिंगळे, जेल दिगंबर, निर्गुण केवल, प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील , सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना यांचा समावेश होता.

यावेळी मिडियाशी बोलताना विश्वनाथन आनंद म्हणाले की “ मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की एडिफाय इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थांच्या कौशल्यपूर्ण खेळाला वाव देत आहे. अभ्यासा प्रमाणाने खेळालाही तेवढेच महत्व देणे गरजेचे आहे, तरच त्यात उत्तम यश नक्की मिळेल.” त्याच बरोबर ते म्हणाले की “ प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देणे आवश्यक आहे तसेच बुद्धिबळात आणि आयुष्यात यश व अपयश पचवण्याची ताकद निर्माण केली पाहिजे.”

शाळेच्या मुख्याधापिका प्रिया आनंद म्हणाल्या की “अंतिम १२ स्पर्धकांना  विश्वनाथन आनंद यांच्या बरोबर बुद्धिबळ खेळण्याची खूप मोठी संधी मिळाली. यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, विश्वनाथन यांच्या कडून मिळालेल्या टिप्स स्पर्धकांना आयुष्यभर नक्कीच उपयोगी पडतील हा मला विश्वास आहे.”

त्याच बरोबर पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष जोसेफ डिसूझा म्हणाले की, “या स्पर्धेत सहभाग झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी होती स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्या कडून बुद्धिबळाच्या खेळातील विविध  टिप्स व प्रेरणा मिळाली.”

या वेळी विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते एडिफाय इंटरनॅशनल स्कूलच्या आयबी अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले तसेच त्यांच्याच हस्ते बुद्धिबळ स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम बारा स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे आहेत, कशिष जैन, शिवराज पिंगळे , जेल दिगंबर , निर्गुण केवल , अद्वैत पाटील , प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील, सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना. या बारा स्पर्धकांना पुढील प्रमाणे बक्षीस प्रदान करण्यात आली. (१) १०,०००/-  (२) ६,०००/- (३) ४,०००/-  (४) २,५००/-  (५) २,५००/-  (६) २,०००/-  (७) २,०००/- (८) २,०००/- (९) २,०००/- (१०) २,०००/- (११) पारितोषिक व प्रशस्तिपत्रक (१२) पारितोषिक व प्रशस्तिपत्रक.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...