एक भारत श्रेष्ठ भारत या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांची स्टेच्यु ऑफ युनिटी ला भेट
-पुणेअखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती,
पुणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या अभियाना अंतर्गत गुजरात मधील स्टेच्यु ऑफ युनिटी
या आयर्न मॅन ऑफ इंडिया, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकास नुकतीच भेट दिली. या भेटी दरम्यान
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जगाला एकतेचा संदेश देणाऱ्या भव्य प्रकल्पाची संरचना, बांधकाम, देखभाल तसेच
सरदार पटेलांच्या कर्तृत्वाची, देशाप्रती असलेल्या योगदाना विषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या जयंतीस १५० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त विद्यार्थ्यांनी साबरमती आश्रमास भेट देऊन महात्मा गांधीना
अभिवादन केले. या अभ्यास सहलीचे आयोजन प्रा.गणेश कोंढाळकर यांनी केले. तर या अभ्यास सहलीमध्ये
प्रा.संदीप राऊत, प्रा. दत्तात्रय कांबळे, डॉ. बालाजी सेलूलकर, प्रा.मनोज मुळीक, प्रा.कमलेश जेठा, प्रा.स्नेहल
वीर, प्रा.धनश्री जोशी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभ्यास सहलीसाठी
संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.