‘मिर्जापुर’ आणि ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ च्यामूळे अली फजल-कीर्ति कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स !!

Date:

टेलिव्हिजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेब सीरीजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. त्यामूळेच तर वेबसीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोविंगही खूप जास्त वाढत आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात ‘मिर्जापुर’चा अभिनेता अली फजल आणि ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री कीर्ति कुलहारी वेबसीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

वेब सीरिजच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये कीर्ति कुलहारीने अमेज़ॉन प्राइमच्या ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ह्या मालिकेत दिलेल्या आपल्या बोल्ड परफॉर्मन्समूळे नंबर वन स्थान पटकावले. इतके दिवस वेबसीरिज स्टार्सच्या लोकप्रियतेत नंबर वन स्थानी असलेल्या राधिका आपटेला कीर्तिने 94 गुणांसह नंबर स्थानी येऊन मागे टाकले. नेटफ्लिक्सच्या ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘घोल’ मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या लोकप्रियतेत 46गुणांसह दूस-या स्थानावर आहे. ‘बीएफएफ विथ वोग’ सीजन 2 (वूट) ने नेहा धूपियाला तिस-या स्थानावर नेऊन ठेवले. तर ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ (वूट) आणि रसभरी ह्या वेबमालिकांमूळे स्वरा भास्कर चौथ्या पदावर पोहोचली.’फोर मोर शॉट्स प्लीज’ची अभिनेत्री लीजा रे पांचव्या स्थानावर आहे.

लोकप्रिय अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये अमेज़ॉनच्या ‘मिर्जापुर’मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा अभिनेता अली फ़जल लोकप्रियतेत प्रथम स्थानी आहे. 79 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या अली ने ऑल्ट बालाजीच्या ‘कहने को हमसफर हैं’ वेबसीरिजचा अभिनेता रोनित रॉयला लोकप्रियतेत मागे टाकलंय. रोनित 48 गुणांसह दूस-या स्थानावर आहे, ‘सॅक्रेड गेम्स’चे दोन्ही लोकप्रिय अभिनेते सैफ अली खान और नवाजुद्दीन सिद्दिकी ह्या यादीत तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तर ‘मिर्जापुर’मूळे अभिनेता पंकज त्रिपाठीच्या लोकप्रियतेत वाढ होऊन ते पांचव्या स्थानावर आहेत.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कीर्ति आणि अलीची लोकप्रियता डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये दिसून आली होती.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “वेब सीरीज़च्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लेटफॉर्म, वायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्स मध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पूरावा आहे. भले ही मेनस्ट्रीम सिनेमामध्ये ह्यातले काही कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येत नसले तरीही वेबसीरिजच्या जगातले ते तारे-तारका आहेत.”

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त लाल महालात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुष्पहार अर्पण; “लाडक्या बहिणींमागे जिजाऊंची प्रेरणा”

पुणे, दि.१२: स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील...

नियोजनबद्ध विकासासाठी काँग्रेस उमेदवार विजयी करा..! काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

प्राथमिक आरोग्य व शिक्षण सुविधांसह,वहातुक कोंडी मुक्त ‘पुणे करू...

नामंवत सायकलपट्टूचे क्रीडा कौशल्य बघण्याची संधी गमावू नका-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हाधिकाऱ्यांनी फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन पुणे, दि. १२: ‘बजाज...

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार: राघवेंद्र बाप्पू मानकर

पुणे: प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज...