मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जात खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. संजय राऊतांना ईडीने 9 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते, त्यानंतर १८ तासाने रात्री उशिरा ईडीने राऊतांना अटक केली. राऊतांना ईडीचे अधिकारी घेऊन गेले, त्यावेळी त्यांच्या मातोश्री हवालदिल झाल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत हे एकटे नाहीत. शिवसेना परिवार राऊतांसोबत आहे, असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवास स्थानी जाऊन संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना धीर देत संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती आहे.